Ajay Kholkar| मी आरजीपीचा संस्थापक सदस्यच

अजय खोलकर यांचा दावा : राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवणाऱ्या बोरकरांची वर्तणूक हुकूमशाहीसारखी
Ajay Kholkar
Ajay Kholkar
Published on
Updated on

पणजी : वीरेश बोरकर यांनी अजय खोलकर हे पक्षाचे संस्थापक सदस्यच नाहीत, असा दावा केला आहे. त्याबाबत खोलकर म्हणाले की, आरजीपीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेपासून मी पक्षासोबत आहे. ११९ लोकांनी पक्ष नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात सांताक्रुझमधून संस्थापक सदस्य म्हणून मीही होतो. नंतर ११९ मधील सदस्यांची संस्थापक, कार्यकारी आणि प्राथमिक सदस्य अशी विभागणी झाली. मला पक्षाची घटना पूर्ण ज्ञात आहे.

ऑफिस ताब्यात घेण्याबाबत खोलकर म्हणाले की, सायंकाळी ७ वाजता कार्यालयाच्या दरवाजावर नोटीस लावण्यात आली, तर मध्यरात्री १ वाजता कार्यालय सील करण्यात आले. बोरकर ऑफिसवर दावा करीत आहेत, तर त्यांच्याजवळ चावी कशी नाही, तसेच आपला पक्ष प्रादेशिक (राज्यस्तरीय) आहे, मग बोरकर राष्ट्रीय अध्यक्ष कसे, असाही प्रश्न खोलकर यांनी उपस्थित केला आहे. कार्यालय नोंदणीकृत व अधिकृत आहे. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तथापि, बेकायदेशीरपणे कुणी ताबा घेत असेल, तर योग्य ती कारवाई आम्ही करू. कार्यालयाच्या दरवाजावर ती नोटीस कुणी लावली, ऑफिस कुणी सील केले याबाबत माहिती नाही. स्वतःला स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवणाऱ्या बोरकर यांनी ते केले असेल, तर त्यांनी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यायला हवी होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे सांगून खोलकर म्हणाले की, आम्ही शिस्तपालन समितीसमोर उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही, कारण मला पाठवलेली नोटीसच बेकायदा आहे, बोरकर हुकूमशाहीने वागत आहेत, असेही खोलकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news