Goa News | देवदी खूनप्रकरणी अभिषेक, मुतुप्पाला उच्च न्यायालयाकडून जामीन नामंजूर

Goa News | अहमद देवदी याच्या खूनप्रकरणातील संशयित अभिषेक पुजारी व मुतुप्पा ऊर्फ सन्नी बगप्पा निकोडे यानी जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला.
High Court judgment on alimony case
High Court judgment Pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अहमद देवदी याच्या खूनप्रकरणातील संशयित अभिषेक पुजारी व मुतुप्पा ऊर्फ सन्नी बगप्पा निकोडे यानी जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला. या प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत व सुनावणी शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे त्यामुळे या टप्प्यावर जामीन मंजूर करण्यास न्यायालय इच्छुक नाही असे निरीक्षण केले आहे.

High Court judgment on alimony case
Zilla Panchayat Election | हणजूणमध्ये होणार हायव्होल्टेज लढत

या प्रकरणात एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. मयत व्यक्ती २८ वर्षांचा एक तरुण मुलगा होता, ज्याच्यावर पत्नी आणि कुटुंबाची जबाबदारी होती. आरोपीच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाचा विचार करताना, न्यायालय पीडित कुटंबाच्या दयनीय अवस्थेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

आरोपीच्या हक्कांचा समतोल पीडिताचे हक्क, असुरक्षित साक्षीदार आणि कायदा, सुव्यवस्था व सार्वजनिक सुरक्षा राखण्यामधील समाजाच्या व्यापक हिताशी साधावा लागेल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

गणेशपुरी म्हापसा येथे ३० मे २०२४ रोजी रात्री ३ च्या सुमारास अहमद दिवेदी व संदेश साळकर हे स्कुटरवर बसलेले असताना रामकृष्ण उत्तम भालेकर उर्फ आर. के. व त्याच्या इतर मित्रांनी लोखंडी रॉडने व चाकूने हल्ला केला होता.

या हल्लयात दिवेदी व साळकर हे गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळावरून फिरोझ खान याने त्यांना इस्पितळात नेले होते. त्याना म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले दिवेदी याचा गोमेकॉ इस्पिथालातील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी खून व कटकारस्थानच्या आरोपाखाल अभिषेक पुजारी, मुतुप्पा, आर. के. मंथन राजू, श्रीधर किल्लेदार, नाग्या ऊप नागराज पुजारी, शरन बासू, सन्त्र नायकोडे, नारायण उत्तम भालेकर ऊप बाबू, याच्यासह आठजणांविरुद्ध गुन्ह नोंद केला होता.

High Court judgment on alimony case
Molestation Case | तरुणीचा विनयभंग; केरळ येथील तरुणाला अटक

याप्रकरणी म्हापस पोलिसांनी सर्व संशयिताविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केल् असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. संशयितांना जामीन मिळाल्यास वे साक्षीदारांना तसेच मयत अहमद दिवेदी याच्या कुटुंबियाला धमकावण्याच शक्यता आहे. साक्षीदार न्यायालयात भीतीमुळे साक्ष देऊ शकणार नाहीत घडलेल्या घटनेतून मयताचे कुटुंब अजून सावरलेले नाहीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news