Aam Aadmi Party Goa | आम आदमी पक्षाचा गोवा फॉरवर्डला अल्टीमेटम! काँग्रेससोबतच्या युतीवरून भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान

Aam Aadmi Party Goa | काँग्रेसबाबत भूमिका स्पष्ट करण्याची वाल्मिकी नाईक यांची मागणी
Aam Aadmi Party Goa
Aam Aadmi Party Goa
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भविष्याचा विचार करून गोवा फॉरवर्डसोबत 'गोवा फर्स्ट' युती केली आहे. आगामी निवडणुकीत गोमंतकीयांना नवी दिशा मिळावी आणि भाजप-काँग्रेसच्या छुप्या युतीपासून जनतेची सुटका व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी काँग्रेसला युतीत घेण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भूमिका स्पष्ट करावी, असा अल्टीमेटमच जणू आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सोमवारी दिला.

Aam Aadmi Party Goa
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा आणि कार्याध्यक्ष संदेश तेलेकर देसाई उपस्थित होते. नाईक म्हणाले की, गोव्याचा मागील ४० वर्षांचा राजकीय इतिहास पक्षांतर आणि पक्ष फोडण्याने भरलेला आहे.

गेल्या १० वर्षांत भाजप-काँग्रेसच्या छुप्या युतीमुळे लोकशाहीची थट्टा चालली आहे. जनतेने कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी काँग्रेसच्या आमदारांच्या पक्षांतरामुळे अखेरीस भाजपच सत्तेवर येतो. ४० वर्षांत केवळ दोनदा एका पक्षाला बहुमत मिळून पाच वर्षे सरकार चालवता आले. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष फोडाफोडीचे राजकारण करतात, असा आरोप त्यांनी केला.

गोव्याची स्थिती गुजरातसारखी:

गोव्याची स्थिती गुजरातसारखी होत चालली आहे. तिथे ३० वर्षांहून अधिक काळ एकाच पक्षाची सत्ता आहे. २०१७ आणि २०२२ मध्ये काँग्रेसच्या आमदारांनी मंदिर, चर्च आणि मशिदीत शपथ घेऊन तसेच प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षऱ्या करूनही पक्षांतर केले. याच पार्श्वभूमीवर 'गोवा फर्स्ट'ची स्थापना केली आहे. ही युती भाजप आणि काँग्रेसपासून मुक्त असेल. जनतेला पक्षांतरमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार हवे आहे, असे नाईक म्हणाले.

बाजूचा उर्वरित मजकूर:

गोवा फॉरवर्डसोबतची 'गोवा फर्स्ट' युती भाजप आणि काँग्रेसमुक्त ठेवण्याचे ठरले होते. गोवा फॉरवर्डचीही काँग्रेससोबत युतीची बोलणी न करण्याची भूमिका होती. पुन्हा पक्षांतराची हॅटट्रिक होऊ नये आणि जनतेच्या मनात गैरसमज राहू नये, यासाठी स्पष्टता आवश्यक असल्याचे नाईक म्हणाले.

Aam Aadmi Party Goa
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या १७ पैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या ११ जागांपैकी आठ आमदार सप्टेंबर २०२२ पर्यंत भाजपमध्ये गेले. दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मतदारांनी निवडून दिलेले एकूण १८ आमदार भाजपमध्ये असल्याचा दावा नाईक यांनी केला.
काँग्रेसच्या 'गोवा राखण यात्रे'वर टीका करताना आमदार वेन्झी व्हिएगस म्हणाले की, गोव्याचे रक्षण करायचे असेल तर मुद्द्यांवर बोलले पाहिजे. केवळ पायी चालल्याने गोव्याचे रक्षण होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news