मडगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मडगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Madgaon news
अल्पवयीन मुलीवर अत्याचार file photo
Published on
Updated on

मडगाव : आजारी भावाला भेटण्याकरिता मडगावहून मुंबईला निघालेल्या आणि रेल्वे चुकल्यामुळे भुकेने व्याकुळ अवस्थेत रेल्वे स्थानकाबाहेर अडकून पडलेल्या इयत्ता सातवीतील सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला 58 वर्षीय नराधमाने आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. सध्या त्याला 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे.

रेल्वे चुकल्याने घरी परतण्याची वाट पहाणार्‍या त्या दुर्दैवी मुलीकडे जेवायला पैसे नव्हते. तिच्या त्या अवस्थेचा गैरफायदा घेत संतोष रायकर याने तिला जेवण देण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर नेऊन रात्रभर तिच्यावर बलात्कार केला. घटना समोर येताच त्याच्या मुसक्या आवळण्यास मडगाव पोलिसांना यश आले आहे.

शनिवारी रात्री ही घटना घडली. रात्रभर तिच्यावर बलात्कार करून त्याने पुन्हा सकाळी रेल्वे स्थानकावर आणून सोडले. संतोष याचा मडगावात गाडा असून त्याच्यावर यापूर्वी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि कौटुंबिक अत्याचाराचे गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती पोलिस स्थानकातून उपलब्ध झाली आहे.

ती मुलगी आपल्या आजारी भावाला भेटण्यासाठी रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. पण, तीची गाडी चुकली. तिच्याकडे जेवणासाठी जास्त पैसेही नव्हते. भुकेने व्याकुळ झालेली पीडित अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत रेल्वेस्थानक परिसराच्या बाहेर उभी होती. तिच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यामुळे फोन बंद पडला होता. त्याच वेळी संतोष त्या ठिकाणी आला आणि त्यानें तीची विचारपूस करून तिचा विश्वास संपादन केला.

स्वतःच्या घरी नेऊन जेवण देण्याच्या बहाण्याने तिला हाउसिंग बोर्ड येथील आपल्या फ्लॅटवर नेऊन रात्रभर तिच्यावर बलात्कार केला, असे आढळून आले आहे. तिने स्वतःच्या घरच्यांना काहीच कळवले नव्हते. त्यामुळे त्यांनी ती गायब झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. ती मुलगी भेदरलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडल्यानंतर हा एकंदर प्रकार उघडकीस आला.

संशयिताची पार्श्वभूमीवर वादग्रस्तच

क्रूरपणे मारहाण केल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केली आहे. तो घटस्फोटित असून, विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याचा त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.

  • संशयिताला पोलिस कोठडी

  • असहाय्यतेचा घेतला गैरफायदा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news