पणजी : ट्रक अपघातातील जखमींसाठी मुख्यमंत्री आणि समाजकल्‍याण मंत्री ठरले देवदूत | पुढारी

पणजी : ट्रक अपघातातील जखमींसाठी मुख्यमंत्री आणि समाजकल्‍याण मंत्री ठरले देवदूत

मडगाव ; विशाल नाईक काणकोण ते कुंकळी हा महामार्ग साक्षात मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. पाडी, खड्डे आणि करमल घाटातील अपघातांमध्ये कित्येक जणांनी आपला जीव गमावला आहे. शनिवारी रात्री काजूच्या गोणांनी भरलेला ट्रक अपघात झाला. यात हा ट्रक सुमारे पंचविस मिटर खोल पुलाखाली पडला. तेरा जण काजूने भरलेल्या गोणा खाली चिरडले होले. लहान मुले अक्रोश करत होती, असह्य वेदनेने महिला ओरडत होत्या. बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या त्या गरीब कामगारांसाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई हे खरे देवदूत ठरले. काणकोण दौऱ्यावरून परततांना ताफा थांबवून सुभाष फळदेसाई जीवाची पर्वा न करता थेट नादित उतरले आणि एक एक जखमींना त्यांनी बाहेर काढले. आपण मुख्यमंत्री अहोत याचे भान नसलेले डॉ सावंत स्वत: रुग्णांना पहात होते. मला सुरक्षा नको, तुम्ही जखमींना बाहेर काढा अशा सूचना देत त्यांनी रुग्णाना स्वतःच्या गाडीतून इस्पितळात नेले.

वळणाच्या पुढे पूल आहे याचा अंदाज न आल्याने ट्रक चालकाने थेट घड्याव्हाळ खड्डे (कुंकळी) थेट पुलाच्या कठड्याला धडक दिली. यामुळे ट्रक नदीत कोसळला. काही दिवसांपासून बांधाऱ्याचे काम सुरू होते. त्यामुळे नदीत जास्त पाणी नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. हा अपघात घडला त्यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि अनिवासी आयुक्त नरेंद्र सावईकर हे काणकोण येथील संकल्प यात्रेचा कार्यक्रम आटोपून त्याच मार्गाने परत येत होते.

पुलाजवळ काही लोक जमल्याचे दिसून येताच मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी वाहनांचा ताफा थांबवला आणि थेट रस्त्यावर उतरले. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई त्यांचे पीएसओ सातू देविदास यांनी विलंब न करता नदीत उतरले. दोन्ही मंत्री रस्‍त्‍यावर उतरल्‍याचे पाहून पोलिस आणि अग्निशामक दलही सक्रिय झाले होते. काजुच्या पोत्यांखाली बरेच लोक अडकले होते. त्यांना तातडीने बाहेर न काढल्यास त्यांचा वाचवणे अशक्य होते. त्यामुळे फळदेसाई यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने एक-एक करून काजूची पोती बाजुला केली. जखमी झाल्‍याने वेदनेने व्हीवळणाऱ्या रुग्णांना स्ट्रेचरवर घालुन वर काढले. लहान मुलांचाही त्यात समावेश होता. त्यांना वर काढताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना तपासून ताबडतोब रुग्णवाहिकेत बसवत होते. यावेळी किती जण अडकले असावेत याची त्यांनी चौकशी केली. शिवाय स्वतः जिल्हा इस्पितळाशी संपर्क साधून वैद्यकीय अधिकाऱ्यानां सतर्क राहण्याची सुचना त्यांनी केली. आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत याचेही त्यांना भान नव्हते. ताफ्यातील सर्व पोलिसांना त्यांनी बचावकार्यात लावले होते. रुग्णवाहिका कमी पडल्याने त्यांनी आपल्या गाडीतून रूग्णांना इस्पितळात नेले.

बचावकार्य संपुष्टात आल्यानंतर मंत्री फळदेसाई स्वत: मडगावच्या जिल्हा इस्पितळात रुग्णांसोबत पहाटे तीन वाजेपर्यंत उपस्थित होते. सर्व रुग्णांवर प्रथमोपचार झाल्यानंतर ते बाहेर पडले. या दोन्ही मंत्र्यांनी राबवलेल्या बचावकार्या बद्धल त्यांचे कौतुक केले जात आहे.

अपघात कसा झाला हे माहिती नाही. ते लोक कोणत्या राज्यातील आहेत या पेक्षा त्यांचा जीव वाचवणे महत्वाचे होते. एकूण तेरा जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्या ट्रकमधील काही लोकांनी मद्य प्राशन केल्याचे दिसून येत आहे.
सुभाष फळदेसाई; समाजकल्याण मंत्री

Back to top button