Fake Paneer Seized | सातशे किलो बनावट पनीर जप्त

पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई : एफडीएच्या सापळ्यात भेसळदार अडकला
Fake Paneer Seized
पणजी ः अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत जप्त केलेले दुग्धजन्य पदार्थ, पनीरचा साठा.
Published on
Updated on

पणजी : अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमित हॉटेल तपासणीत पनीरचा एक संशयास्पद पुरवठादार आढळला होता. याच माहितीच्या आधारे पुरवठादारावर विभागाचे अधिकारी पाळत ठेवून होते. पत्रादेवी तपासणी नाक्यावर अधिकार्‍यांनी रचलेल्या सापळ्यात तो अडकला आणि त्याचा सर्व कारनामा उघडकीस आला.

एफडीए अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित तपासणीवेळी ही कारवाई करण्यात आली.हॉटेलमध्ये अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त, लेबलशिवाय पनीर आढळले. केवळ साठा जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा मुख्य पुरवठादारावरच कारवाई करण्यासाठी अधिकार्‍यांनी यंत्रणा तयार केली. त्यानुसार पत्रादेवी तपासणी नाक्यावर रात्री 10 च्या दरम्यान, एफडीएचे अधिकारी पोहोचले. पुरवठादार वाहन मध्यरात्री 1.30 वा. पोहोचले आणि तपासणीनंतर एफडीए पथकाला लेबल नसलेले पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ असे सुमारे 700 किलोग्रॅमचा मुद्देमाल आढळला.

प्रमुख हॉटेल्समध्ये पुरवठा ः कारवाई केलेल्या पनीरचा गोव्यातील प्रमुख हॉटेल्समध्ये पुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पुढील चौकशीसाठी युनिट बंद करण्यात आले आहे. संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी पथकात रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, अमित मांद्रेकर, प्रीतम परब, लेनिन दे सा डार्लन यांच्यासह कर्मचारी, संदीप शेळके, गौरीश गावकर, बाबाजी कोरकणकर आणि साईनाथ च्यारी यांचा समावेश होता.

लेबलवर चुकीच्या तारखा

जप्त केलेल्या पनीरवर 7 नोव्हेंबरऐवजी 9 नोव्हेंबरची तारीख छापण्यात आली होती. हा पुरवठा पर्वरी येथील त्यांच्या संपूर्ण विक्री केंद्रासाठी होता. त्यानंतर पथकाने पहाटे 3 वाजता पर्वरी येथील आऊटलेटला भेट दिली. तेव्हा त्यांना पनीरचे ब्लॉक मुंबई-गोरेगावला पाठवण्यासाठी चुकीच्या तारखांसह लेबलचा वापर करून लहान भागांमध्ये पुन्हा पॅक केल्याचे आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news