‘पॅनोरमा’तून देशाच्या सांस्कृतिक एकतेचे दर्शन : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ने प्रदर्शनाला सुरुवात
55th International Film Festival
पणजी : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते रणदीप हुड्डा यांचा गौरव करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा हा विभाग देशाच्या एकतेचे सांस्कृतिक दर्शन घडवतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

इफ्फीतील इंडियन पॅनोरमा विभागाची गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या रणदीप हुडा दिग्दर्शित चित्रपटाने पॅनोरमा विभागाचा पेटारा उघडण्यात आला. या विभागात 21 फीचर फिल्म, तर 25 नॉन फिचर फिल्म आहेत. हा विभाग देशाच्या वैविध्यपूर्ण सिनेमॅटिक लँडस्केपचे प्रतिनिधित्व करणार्‍या समकालीन भारतीय चित्रपटांचे दर्शन घडवतो. हा प्रतिष्ठित विभाग अपवादात्मक कथाकथन, सिनेमॅटिक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक वैविध्य अधोरेखित करतो, जो भारताच्या दोलायमान चित्रपट-निर्मिती परंपरांना ‘वन विंडो ऑफर’ करतो. भारतीय पॅनोरमासाठी निवडलेले वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, कलात्मक गुणवत्ता, तांत्रिक उत्कृष्टता आणि सामाजिक प्रासंगिकता प्रदर्शित करतात. भारतीय समाजाची जटिलता आणि समृद्धता दर्शवतात. फिचर फिल्म विभागाचे परीक्षण डॉ. चंद्रप्रकाश त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखालील परीक्षण मंडळाने केले असून, नॉन फीचर विभागाचे परीक्षण नाल्ला मुथू यांच्या नेतृत्वाखालील परीक्षण मंडळाने केले आहे. या सर्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या विभागाची सुरुवात रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने झाली. या चित्रपटात रणदीप हुड्डा यांच्यासह अंकिता लोखंडे, अमित सैल, राजेश खेरा यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला, तर नॉन फिचर विभागाची सुरुवात ‘घर जैसे कुछ’ या लघुपटाने झाली.

25 चित्रपटांचा संच

यावर्षीच्या 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर ( माहितीपट) फिल्म्स प्रदर्शित होतील. 384 समकालीन भारतीय चित्रपटांच्या विस्तृत श्रेणीतून, सिनेमाच्या मुख्य प्रवाहातील 5 चित्रपटांसह 25 चित्रपटांचा संच निवडण्यात आला आहे. नॉन-फीचर फिल्म्सचे पॅकेज नवोदित आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांच्या दस्तऐवजीकरण, तपास, मनोरंजन आणि समकालीन भारतीय मूल्ये प्रतिबिंबित करण्याच्या क्षमतेचा प्रत्यय देत आहेत.

4 मराठी आणि 1 कोकणी चित्रपट

इफ्फीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या इंडियन पॅनोरमा अंतर्गत प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांमध्ये चार मराठी आणि एका कोकणी चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटांमध्ये शशी खंदारे यांचा ‘जिप्सी’, नवज्योत बांदिवडेकर यांचा ‘घरात गणपती’, निखिल महाजन यांचा ‘रावसाहेब’, पंकज सोनवणे यांचा ‘प्राणप्रतिष्ठा’, तर शिवम हरमलकर आणि संतोष शेटकर यांच्या ‘सावट’ या कोकणी चित्रपटाचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news