पणजी : वास्‍कोत घरफोडी दरम्‍यान चोरट्यांचा गोळीबार; पोलीस निरीक्षक जखमी

file photo
file photo

वास्को : पुढारी वृत्तसेवा झुआरीनगर, वास्को येथील एमईएस महाविद्यालय परिसरात मध्यरात्री रात्री दोन वाजता बंगला फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांवरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबारानंतर चोरटे पळून गेले असून, पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक हे जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

झुआरीनगर एमईएस महाविद्यालय परिसरात एक बंगला बंदावस्थेत आहे. या बंगल्याचे मालक युके येथे वास्तव्यास आहेत. (सोमवार) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे हा बंगला फोडण्यासाठी आले होते. स्क्रू ड्रायव्हर आणि कुदळीच्या साहाय्याने बंगल्याचा दरवाजा फोडताना झालेल्या आवाजामुळे शेजारील लोकांना जाग आली. घरफोडीचा हा प्रकार लक्षात आल्याने शेजारील एकाने याची माहिती तात्काळ पोलीस स्थानकात दिली. पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक दोन सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. बाहेर टेहळणी करणाऱ्या चोरट्याने पोलिसांना पाहताच बंगल्याचा दरवाजा फोडणाऱ्या सहकाऱ्यांना ओरडून त्‍याने सावध केले.

हे तिघे चोरटे पळून जात असताना त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, यातील एकाने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यातील एक गोळी पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक यांच्या डोक्यावरून गेली. तरीही चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात ते रस्त्यावर पडून जखमी झाले.

घटनास्थळावरून पोलिसांनी तीन दुचाकी जप्त केल्‍या असून, त्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. यातील एक दुचाकी कर्नाटक पासिंगची आहे तर दोन दुचाकी या गोवा पासिंगच्या असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news