पणजी : 2 दिवसांत 29 जणांना सायबर गुन्हेगारांचा गंडा | पुढारी

पणजी : 2 दिवसांत 29 जणांना सायबर गुन्हेगारांचा गंडा

पणजी ः पुढारी वृत्तसेवा : राज्यात दोन दिवसांत 29 जण सायबर गुन्ह्यांचे बळी ठरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांत राज्यात सुमारे 29 जणांना सायबर गुन्हेगारांनी 31 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे.

सोमवारी उत्तर गोव्यातील पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीच्या 6 गुन्ह्यांची नोंद केली. त्यात फसवणूक करणार्‍यांनी सहा जणांची सुमारे 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. घोटाळेबाजांनी अवलंबलेल्या वेगवेगळ्या पद्धतीचे स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सांगितले की, दूरचित्रवाणी संच सील करणे, व्यवसाय करणे, लॉटरी जिंकणे, जास्त परताव्याची हमी देणे, अशा सबबी सांगून लोकांची फसवणूक केली जाते.

गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारच्या अनेक ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. दक्षिण गोव्यात अशाच प्रकारची कार्यपद्धती घेऊन घोटाळेबाजांनी सुमारे 23 जणांना 21 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली. ऑनलाईन आमिषांना बळी पडू नका, असे सांगितले जात असतानाही लोक कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्यासाठी अशा प्रकरणात फसत असल्याचे दिसून आले आहे.

Back to top button