पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीत 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीला आता वेग येत आहे. आतापर्यंत या महोत्सवासाठी 3 हजार 235 जणांनी नोंदणी केली असून, यात 1870 प्रतिनिधी, 635 विद्यार्थी, तर 730 चित्रपट उद्योगाशी निगडित आहेत. याशिवाय इफ्फी कव्हर करण्यासाठी डिजिटल माध्यमातील 26, माध्यम प्रतिनिधी म्हणून 157, तर 26 कॅमेरामननी आपली नोंदणी केली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा मनोरंजन सोसायटीच्या वतीने गोव्यात दरवर्षी होणार्या या चित्रपट महोत्सवासाठीच्या तयारीला आता वेग आला आहे. परिसरातील रंगरंगोटी सुरू आहे. आयनॉक्स थिएटर, कला अकादमी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम यांचीही दुरुस्तीची कामे व तयारी सुरू आहे.