गोवा : बाबूश मोन्सेरात यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची स्तुती | पुढारी

गोवा : बाबूश मोन्सेरात यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची स्तुती

पणजी ः पुढारी वृत्तसेवा गोवा पोलिस चांगले काम करत आहेत. त्यामुळे पोलिसांना दोष देऊ नका, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केली आहे. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चांगले काम करत आहेत, असे ते म्हणाले. मंगळवारी त्यांनी एका वाहिनीशी संवाद साधला.

ते म्हणाले, की गोव्यात इतर राज्यांच्या तुलनेने गुन्ह्यांच्या तपासाची टक्केवारी जास्त आहे. पोलिस खून रोखू शकत नसले तरी गुन्हेगारांना त्वरित पकडले जात आहे. त्यांच्या कामाचे श्रेय आपण त्यांना दिले पाहिजे. ज्या घटना घडतात त्या घडून जात असल्या तरी त्या कमी कशा करता येतील यावर विचार व्हायला हवा.

खून रोखणे अनेकवेळा सरकारच्या व पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर असते. ड्रग्जच्या प्रकरणातही पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुन्हे
घडल्यानंतर फक्त गृहमंत्री आणि पोलिसांना दोष देणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

Back to top button