Families Converted To Hinduism | जुने गोवेत तीनशे कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात

Families Converted To Hinduism | रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून स्वगृही; साधुसंतांच्या उपस्थितीत सोहळा
Goa news
Goa newsGoa news
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

जुने गोवेतील वायंगणी, तिसवाडी येथील श्रीदेव गोवेश्वर महाशिव मंदिराच्या कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून आज तीनशे कुटुंबांनी पुन्हा हिंदूधर्मात प्रवेश केला. अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. परकीय व परधर्मीय धर्म प्रचारकांनी भुलथापा देऊन, अमिषे दाखवून या कुटुंबांना त्यांच्या धर्म स्वीकारणे भाग पडले होते.

Goa news
Yuri Alemao Cuncolim | 2027 मध्ये काँग्रेसच येणार सत्तेत

आता त्यांना या गोष्टीचा पश्चाताप झाला होता. जगद्‌गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांनी त्यांना विश्वास दिला. ते देखील महाराजांच्या उद्धारक विचारांनी प्रेरित झाले. त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली.

आज त्यांनी जगद्वरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. आजच्या या हिंदू धर्म पुनर्प्रवेश सोहळ्याला देशभरात अनेक आखाड्याचे संतमहंत उपस्थित होते. वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी यांनी यावेळी धार्मिक विधी केले.

आतापर्यंत १.५३ लाख बांधवांना हिंदू धर्मात प्रवेश

जगद्‌गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आजवर अशा बाट चुकलेल्या १ लाख ५३ हजार ६४३ बांधवांना वेळोवळी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला आहे. त्यांचे हे महान धर्मकार्य अव्याहतपणे सुरूच आहे. अनेकांनी त्यांच्या या कार्याचा गौरव केला आहे.

Goa news
Ponda Subhash Shirodkar | खेळात यशासाठी आहार-विहार महत्त्वाचा : मंत्री सुभाष शिरोडकर

आज प्राणप्रतिष्ठा, ग्रंथ लोकार्पण

जुने गोव्यातील वायंगणी, तिसवाडी येथे रविवारी (दि. १५) 'गोवेश्वर महाशिव मंदिर' प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम आहे. तसेच 'गोवेश्वर महिमा संहिता' ग्रंथाचे लोकार्पण होणार आहे. हा सोहळा म्हणजे जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेन्द्रचार्याजी यांची संकल्पपूर्ती आहे.

हे मंदिर पाषाणातील कोरीव कलाकृती असून मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना आहे. मंदिराचे संपूर्ण रेखाटन जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी स्वतः केले आहे. त्यासाठी वाराणसी (काशी) येथील प्रसिद्ध चुनार जातीच्या दगडांचा वापर केला आहे.

या मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना होणार आहे. त्यामुळे १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन येथे होणार आहे. मंदिरात सहा फूट उंचीची भव्य 'गोवेश्वर महादेवाची' मुख्य पिंड स्थापित केली आहे. स्वतंत्र बारा गर्भगृहे उभारण्यात आली आहेत. येथे उद्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण आहे. या सोहळ्यात साधुसंत व राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news