पंचायत निवडणूक : दक्षिण गोव्यात ११ वाजेपर्यंत २२ टक्केच मतदान | पुढारी

पंचायत निवडणूक : दक्षिण गोव्यात ११ वाजेपर्यंत २२ टक्केच मतदान

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण गोव्यात पंचायत निवडणुकीसाठी आज (दि.१०) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत केवळ २२ टक्केच मतदान झाले. दक्षिण गोव्यात प्रत्येक बुथवर पोलीस तैनात असून ११ वाजेपर्यंत सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली.

सासष्टीत एकंदरीत ८२ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. एकूण १,४९,६२३ मतदार आहेत. मात्र, मतदान सुरू झाल्यापासून गेले चार तास केवळ १४ टक्केच मतदान झाल्याचे दिसून आले. मतदारांचा अत्यंत अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
महिलांचे मतदान मोठ्या संख्येने असले, तरीही मतदान करण्यासाठी अत्यंत कमी महिला घराबाहेर पडल्याचे चित्र दक्षिण गोव्यात आहे. सांगे भागात जोरदार पाऊस असल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकही घराबाहेर मतदानासाठी पडले नाहीत. तर शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी वर्ग कामात व्यस्त असल्याने मतदानाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button