गोवा : मृत पोलिस कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना ३० लाखांची मदत आणि नोकरी मिळणार | पुढारी

गोवा : मृत पोलिस कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना ३० लाखांची मदत आणि नोकरी मिळणार

पणजी ; पुढारी वृत्‍तसेवा

सुरावली येथे बंदोबस्तादरम्यान अपघातात मृत्यू आलेल्या गोवा पोलीस खात्यातील पोलिस शिपायांच्या कुटुंबाला प्रत्येकी ३०  लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबरोबर त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना सहा महिन्यांच्या आत सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी ही माहिती दिली आहे.

कवळेकर यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्यांशी फ़ोनवर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. आज (रविवार) पहाटे सुरावली येथे बंदोबस्ता दरम्यान कार गाडीने ठोकर मारल्याने विश्वास दयिकर आणि शैलेश गावकर या पोलिस शिपायांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हे दोघे पोलीस शिपाई केपे येथील रहिवासी आहेत.

Back to top button