

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी सहा वाजता अधिकृतपणे संपुष्टात आला. पुढील 24 तास वैयक्तिक पातळीवर मतदारांच्या संपर्कात उमेदवार असतील. आठवी विधानसभा निवडण्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. (Goa Election 2022)
यंदा 30 मे 2022 रोजी गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यास 35 वर्षे पूर्ण होणार आहेत. घटक राज्य झाल्यानंतर होणारी ही आठवी निवडणूक आहे. सोमवारी 11 लाख 64 हजार 224 मतदार 301 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवतील. मतमोजणी 10 मार्च रोजी असल्याने नवे सरकार त्यानंतरच सत्तारूढ होणार आहे.
अनेक मतदारसंघात उमेदवारांचे भवितव्य महिला मतदार निश्चित करणार आहेत. या निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 16 हजार 852 ने अधिक आहे. 40 पैकी 38 मतदारसंघांत म्हणजे 95 टक्के मतदारसंघांत महिला मतदार पुरुषांपेक्षा जास्त आहेत.
केवळ फोंडा व वास्को मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांपेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त मतदार हे वास्को मतदारसंघात 35 हजार 139 आहेत. मुरगावमध्ये सर्वात कमी 19 हजार 958 मतदार आहेत. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 73 टक्के मतदार आहेत.
या विधानसभा निवडणुकीत सोमवारी किती टक्के मतदान होणार याकडे राजकीय निरीक्षकांसह पक्ष धुरिणांचेही लक्ष आहे. मतदान टक्केवारी आणि विजयाची संधी अशी समीकरणे आहेत. त्याआधारे सत्ता कोणाची हेही ठरणार आहे. यामुळे मतदान टक्केवारी किती असावी, याविषयी राजकीय अंदाज वर्तवतण्याची तयारी सुरू झाली आहे.
22 नोव्हेंबर 1989
16 नोव्हेंबर 1994
4 जून 1999
30 मे 2002
2 जून 2007
3 मार्च 2012
6 फेब्रुवारी 2017
राज्याची विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक एकाचवेळी होत नाही. तिसर्या विधानसभेची मुदत जून 2004 पर्यंत होती. मात्र ती विधानसभा फेब्रुवारी 2002 मध्ये विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून विधानसभेची निवडणूक वेगळी व लोकसभेची निवडणूक वेगळी घेण्यात येते. तसे झाले नसते तर 2009, 2014 आणि 2024 मध्ये विधानसभेसाठी मतदान झाले असते.