फडणीसवाड्यातील गणेश जन्मोत्सव सोहळ्याला 300 वर्षांची परंपरा

पारंपरिक सोहळा बुधवारपासून सुरू; 5 दिवस धार्मिक कार्यक्रम
Ganesh Janmotsav celebration
गणेश जन्मोत्सव Pudhari
Published on
Updated on

अर्जुन खोपडे

भोर शहरातील शिवापुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या श्रीगणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या 18 व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही सुरू आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा वापर करून श्रीगणेश जन्मोत्सव सोहळा 4 सप्टेंबरपासून साजरा केला जातो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या काळापासून 300 वर्षांपूर्वी व्यंकोजी फडणीस आणि चिंतामणी फडणीस यांनी भाद्रपद शुक्ल प्रतिपदा ते भाद्रपद शुक्ल पंचमीदरम्यान पाच दिवस अष्टविनायक गणपती उत्सवाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. गणपती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अरुणकाका जोशी यांच्या घरून गणेशमूर्ती सजविलेल्या पालखीतून वाजतगाजत फडणीस वाड्यात आणून प्राणप्रतिष्ठापना केली जाते. गणपतीला दररोज एक हजार दूर्वा वहिल्या जातात. दुपारी 11 ते 12.30 कीर्तन व नंतर गणेशाला पाळण्यात ठेवून पाळण्याची दोरी ओढून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यानंतर गणेश पुराण वाचन, कीर्तन-प्रवचन आणि रात्री धूपारती कार्यक्रम होतो.

छत्रपतींच्या काळात सारा वसुलीचे काम

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या काळात विचित्रगड संस्थानात फडणीस कोषागार होते. त्यांचे कार्यक्षेत्र महाबळेश्वरपासून ते सुधागड, पालीपर्यंत असल्याने तेथपर्यंत कारभार होता. त्याचा सारा वसूल करण्याचे काम फडणीसांचे वंशज करीत होते. त्यांचे पूर्वीचे नाव लोहकरे होते. मात्र, महाराजांनी त्यांना ”फडणीस” ही पदवी दिल्याने तेव्हापासून त्यांना फडणीस म्हणून ओळखू जाऊ लागले. भोरचे राजे पंतसचिव पूर्वी आंबवडे गावात व फडणीस हे चिखलावडे गावात राहत होते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीगणेशोत्सव यंदा भाद्रपद शु. प्रतिपदा बुधवार दि. 4 सप्टेंबर ते रविवार दि. 8 सप्टेंबर भाद्रपद शु. पंचमीपर्यंत होणार आहे. यामध्ये दुपारी 11 ते 12 जन्मकाळाचे रामचंद्र बुवा भिडे यांचे सुश्राव्य कीर्तन, गणेशपुराण वाचन, संध्याकाळी 7.30 ला श्रींची आरती, रात्री 11.30 ते 1:30 लळीत कीर्तन व प्रसाद आणि त्यानंतर रविवारी जन्म सोहळ्याची सांगता करण्यात येईल.

गणेश प्राणप्रतिष्ठेच्या दुसर्‍या दिवशी रामचंद्रबुवा भिडे यांचे कीर्तन आहे. त्याचा प्रसाद रात्री दिला जातो. अशा पद्धतीने जन्मोत्सव संपूर्ण राज्यात आणि भोर येथील फडणीस वाड्यात व पुणे येथील शनिवारवाड्यात पेशवे, तर मुजुमदार वाड्यात मुजुमदार मागील 300 वर्षांपासून अखंडपणे साजरे करीत आहेत.

व्यंकटेश फडणीस, प्रमोद फडणीस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news