Satara Angapur Bhadrotsav- गणपती न बसवणाऱ्या अंगापूरची अनोखी भक्ती

गणेशोत्सवात जत्रेप्रमाणे साजरा केला जातो भद्रोत्सव
satara ganesh statue
अंगापूर मंदिरातील स्वयंभू गणेशमूर्ती.
Published on
Updated on

अंगापूर (जि. सातारा) : प्रवीण पवार

सातारा तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे जिथे गणपती बसवला जात नाही. गणेशोत्सवात गावात घरोघरी अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केली जात नाही. या गावात गणेशाची स्वयंभू मूर्ती असल्यामुळे स्वतंत्र मूर्ती बसवण्याची प्रथा नाही. सुमारे ३५० वर्षांपासून या गावात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, गणेशोत्सवात गावच्या जत्रेप्रमाणे भद्रोत्सव साजरा केला जातो व गणेशभक्तीला आणखी उधाण येते.

गणेशोत्सव म्हटले की भव्यदिव्य गणेशमूर्ती, आकर्षक आरास केलेला मंडप, परिसरातील झगमगाट, असे बहरून गेलेले वातावरण पहायला मिळते. या साऱ्या बार्बीना फाटा देणारे अंगापूर हे आगळ्यावेगळ्या गाव गणेशोत्सवाबाबत प्रसिद्ध आहे. या गावातील गणेशोत्सव सध्या चर्चेत आहे. सार्वजनिक व घरोघरी गणपती न बसवणारे हे गाव गणेशभक्तीची अनोखी परंपरा मात्र मोठ्या श्रद्धेने जपत आले आहे.

गावात स्वयंभू गणेशमूर्तीचे मंदिर असून या मंदिराला प्राचीन इतिहास आहे. या मंदिरातील पूजाअर्चा १२ महिने सुरू असते. या आत्मगजाननाचा भद्रोत्सव मोठ्या उत्साहात भाद्रपद शु. चतुर्थी नि पंचमी या दोन दिवशी परंपरेनुसार साजरा केला जातो. या गावची ही परंपरा इतरत्र कोठेही दिसत नाही.

चतुर्थीला अंगापूरच्या चारी बाजूला ६५ की. मी. अनवाणी पायाने परिक्रमा करणे म्हणजे दोरयाचा कार्यक्रम होतो. ज्यात शेकडो तरुण 'दोरया म्हणा मोरया, मोरया म्हणा दोरया'च्या गजरात सहभागी असतात. त्याचा भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही हा भद्रोत्सव गणपती आगमनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी असाच अमाप उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला.

satara ganesh statue
Ganeshotsav News : साताऱ्यातील रस्ते गणेशभक्तांनी ओसंडले

गणेश समारोप नि नवसाची मुले उत्सव ओलांडण्याचा कार्यक्रम

पंचमीला डोक्यावर पेटते भद्रपात्र घेऊन दीक्षित मानकरी जे एक महिना अगोदर गणेशाची उपासना करतात. दोन्ही गावातून प्रदक्षिणा करून मंदिरात येऊन पाच प्रदक्षिणा व नंतर नवसासाठी आलेल्या शेकडो महिलांची ओठी असे कार्यक्रम संपन्न झाले. भद्रोत्सवातील हे दोन दिवस म्हणजे अंगापूरची यात्रा असते.

satara ganesh statue
Latur News : लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा वेतन घोटाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news