Mumbai Ganpati idol USA : न्यू जर्सीच्या राजाची चक्क ‘फोल्डेबल’ मूर्ती!

सुमारे महिनाभराच्या सागरी प्रवासानंतर मूर्ती न्यू जर्सीत दाखल
Mumbai Ganpati idol USA
Mumbai Ganpati idol USApudhari photo
Published on
Updated on

मुंबई : गावदेवी येथील प्रख्यात मूर्तिकार आशिष पाटकर यांनी साकारलेल्या ‘न्यू जर्सीचा राजा’ या १४ फूट उंच गणेशमूर्तीची अमेरिकेतील न्यू जर्सी येथे विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. फायबरपासून घडवलेली ही अनोखी मूर्ती तीन स्वतंत्र भागांत तयार करण्यात आली असून ती पूर्णपणे फोल्डेबल स्वरूपाची आहे. मुंबईहून कार्गो जहाजाद्वारे सुमारे महिन्याभराच्या सागरी प्रवासानंतर न्यू जर्सी येथे दाखल झाल्यानंतर तेथील एका मोठ्या सभागृहात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली.

गेल्या नऊ वर्षांपासून आशिष पाटकर न्यू जर्सीच्या राजासाठी दरवर्षी विविध रूपांतील भव्य-दिव्य गणेशमूर्ती साकारत आहेत. यंदाची मूर्ती घडवण्यासाठी त्यांना सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागला. प्रथम मातीतून रचना तयार करून त्याचा साचा बनवण्यात आला. त्यानंतर फायबरमध्ये तिन्ही भाग घडवून फिनिशिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंग करण्यात आले. या मूर्तीचा पोटाखालील आणि पोटावरील भाग वेगळा ठेवण्यात आला आहे.

Mumbai Ganpati idol USA
Mumbai Crime : लालबागच्या गणेशोत्सवात दागिने, रोकड, मोबाईलवर डल्ला; इंदूरच्या दोघांना अटक

लोखंडी अँगलचा गाभा तयार करून ‘मेल-फिमेल’ पद्धतीने तिन्ही भागांची जोडणी केल्यानंतर ही मूर्ती प्रत्यक्ष उभी राहते, अशी माहिती पाटकर यांनी दिली. गेल्या नऊ वर्षांत अशा अनेक अनोख्या रूपांतील मूर्ती घडवून मी अमेरिकेला पाठवल्या आहेत. गेल्या वर्षी २२ फूट उंचीची सिद्धिविनायकाची मूर्ती मखरासहित पाठवली होती,” असे पाटकर यांनी सांगितले.

गेल्या २५ वर्षांपासून आपण या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगताना पाटकर म्हणाले, “हा आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे. जीएसबीचा महागणपती मी आणि माझे बंधू अविनाश पाटकर दरवर्षी स्वतः पारंपरिक पद्धतीने शाडू मातीपासून घडवतो. गेल्या तीन पिढ्या आम्ही जीएसबीचा महागणपती घडवत आहोत.

Mumbai Ganpati idol USA
Raigad Gauri Festival: हात सोडून डोक्यावर तोल सांभाळत नाचवली जाणारी अनोखी गौराई

न्यू जर्सी येथे मूर्ती पोहोचल्यानंतर तेथे स्थायिक असलेले पारशी गृहस्थ पिरियन भाई स्वतः पुढाकार घेऊन पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून सभागृहात गणरायाची प्रतिष्ठापना करतात. त्यानंतर तेथील सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात. श्रींच्या दर्शनासाठी सभागृहात भाविकांची मोठी गर्दी होत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news