राहुल गांधी : ‘जे श्रीलंकेत चाललं आहे ते भारतात लवकरच होईल’

राहुल गांधी : ‘जे श्रीलंकेत चाललं आहे ते भारतात लवकरच होईल’
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राहुल यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप पक्षावर सडकून टीका केली. दरम्यान राहुल गांधी म्हणाले की, सरकारने देशाचे विभाजन केले आहे. देश पूर्वी एक होता, पण आता विभागला गेला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राहुल म्हणाले की, 'हिंदूस्थान पूर्वी एक देश होता, आता तो विभागला जात आहे. हिंदूस्थानला विभागून लोकांमध्ये भांडणे लावली आहेत. मीडिया, सीबीआय, ईडी सर्व काही सरकारच्या नियंत्रणात आलं आहे. आता लाऊडस्पीकर देखील सरकारच्या नियंत्रणाखाली आणलेला आहे. लोकांमध्ये द्वेष पसरत चालला आहे. ज्यावेळी या वेदना जाणवू लागतील त्यावेळी हिंसा वाढू लागेल. आता माझे हे मत तुम्हाला पटत नसेल, पण 2-3 वर्षांनंतर पहा काय होतं ते.

ते म्हणाले की, गेल्या 2-3 वर्षांत मीडिया, अनेक संस्था, भाजप नेते, आरएसएस यांनी हे सत्य लपवले आहे. हळूहळू हे सत्य बाहेर येईल. सध्या श्रीलंकेत हेच घडत आहे. भारतातही लवकरच सत्य समोर येईल."

राहुल गांधी पुढे असेही म्हणाले की, "जसे रशिया युक्रेनला सांगत आहे की डोनबास आणि लुहान्स्क तुमचे नाहीत. त्याचप्रमाणे लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे आपले नाहीत, असे चीन भारताला सांगत आहे. म्हणूनच त्यांनी आपले सैन्य तिथेच बसवले आहे. जे मॉडेल तिथे लागू केले आहे ते इथेही करता येईल.

दरम्यान वाढत्या महागाईवर बोलताना राहुल म्हणाले, भारताच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात तो काळ कसा असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. येणारा काळ, तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पाहिला नसेल. या देशाला रोजगार देणारे एसएसआय युनिट आहे ." ते म्हणाले की, देशातील रोजगाराची रचनाच मोडकळीस आली आहे. पंतप्रधान परदेशात पाहून देशासाठी योजना बनवत आहेत. ज्या देशात शांतता नाही, तिथे समस्या असतील.

वास्तविक, नुकतेच शरद यादव यांनी लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला आहे. जेडीयूपासून फारकत घेत त्यांनी लोकतांत्रिक जनता दल हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, पण त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. हे पाहता शरद यादव यांनी राजदमध्ये प्रवेश केला. बिहार आणि देशातील इतर राज्यांतील विरोधी गटाच्या एकजुटीच्या संदर्भात राहुल त्यांना भेटायला आले असावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news