

पुढारी ऑनलाईन : माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुरानी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी गुजरातमधील जामनगर येथील त्यांच्या घरी निधन झाले. ते कर्करोगाने त्रस्त होते. सलीम यांच्यावर जानेवारीमध्ये फ्रॅक्चरवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
1960 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे दुरानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. त्यांनी भारतासाठी एकूण 29 कसोटी सामने खेळले, या कालावधीत त्यांनी 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 1202 धावा केल्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 755 विकेट्स घेतल्या आहेत.
1961-62 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या मालिका विजयादरम्यान दुरानी एक नायक होते. त्यांनी कोलकाता आणि चेन्नई येथे अनुक्रमे 8 आणि 10 विकेट्स घेतल्या. एका दशकानंतर, क्लाईव्ह लॉईड आणि गॅरी सोबर्स यांच्या विकेट्स घेऊन, पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या पहिल्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता.