

शिरोळ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन शिरोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप पाटील यांचे आज (दि. ०४) शुक्रवारी पहाटे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शिरोळ शहरावर शोककळा पसरली आहे. (Dilip Patil Shirol)
पाटील हे काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सर्वात निकटवर्तीय होते. राजकीय जीवनामध्ये वाटचाल करताना ध्येय आणि निष्ठा याबाबत कोणतीही तडजोड नाही अशी त्यांची ख्याती होती. (Dilip Patil Shirol)