

ओतूर: पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील वाटखळे गावच्या हद्दीत चारचाकीचा भीषण अपघातात तीनजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची खात्रीशीर प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात सोमवारी (दि. ३) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला.
हा अपघात इतका भीषण होता की दोन्हीही वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे निदर्शनास येत आहे, तसेच दोन्हीही वाहने अतिशय वेगात असल्याचे या अपघाताचे मुख्य कारण आहे असे स्थानिक प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
अपघातात मृत्यू पावलेले तीनजण आणि जखमी व्यक्तीची ओळख याबाबत अद्यापही माहिती मिळालेली नाही. स्थानिक नागरिक आणि ओतूर पोलिसांची टीम मदत कार्य करीत आहे.