Lok Sabha Election : राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर

Lok Sabha Election : राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरद पवार गटाची (NCP Sharad Pawar Party) लोकसभेसाठी आज पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्या आणखी काही नेत्यांची नावे या यादीत आहेत. पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.

महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं १७ उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही नावांची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीच्या प्रतिक्षेत होता. आज ही यादी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपआपल्या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा केला आहे. (Lok Sabha Election 2024)

शरद पवार गटाच्या पहिल्या यादीतील नावे

यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे (Amar Kale), दिंडोरी मधून भास्करराव भगरे (Bhaskar Rao Bhagre) तर नीलेश लंके ( Nilesh Lanke) यांना ​​​​​​​अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी या नावांची घोषणा केली. (Lok Sabha Election 2024 First list of NCP Sharad Chandra Pawar party announced)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news