कल्याण : ‘माझ्या बाळाला माझ्याकडे द्या’, अमानुष छळ झालेल्या विवाहितेची आर्त विनवणी

Bhumika pawar
Bhumika pawar
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : मला दिवसरात्र उपाशी ठेऊन मारझोड केली. इतकेच नव्हे तर माझ्या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन फरार झाले. मला माझ्या तीन महिन्याच्या बाळापासून तोडले. मला माझे बाळ हवे आहे. असे हृदयद्रावक शब्द आहेत, एका आईचे. एका विवाहितेचा छळ करून तिला तिच्या बाळापासून दूर करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात हुंडाबळीची तक्रार दाखल झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, २३ वर्षांची भूमिका पवार नवीन संसाराची स्वप्नं पाहत मे २०१९ मध्ये लग्न करून औरंगाबादहून कल्याणला आली. मात्र, तिच्या संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला. लग्नानंतर केवळ तीन महिन्यातच सासू , नणंद आणि नवऱ्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

दिवसभर काम करून झाल्यानंतर तिला उपाशी ठेवणे, पाच पाच मिनिटाला सतत तिच्याकडून लादी पुसून घेणे, चाकूने मारणे, छातीवर बसून गळा दाबणे, तिच्या तोंडात बोळा कोंबून ठेवणे, अशा प्रकारे त्रास देण्याचे जणू घरात रोजचेच कट रचले जात होते. इतकेच नव्हे, तर भूमिकाकडून एका स्टॅम्प पेपरवर माझं काही झालं तर माझे माहेरचे लोक जबाबदार असतील, असे लिहून घेतले होते. घरी काही सांगितलेस तर भावाला गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी तिला दिली जात होती.

पीडितेला आई- वडील, बहीण- भाऊ यांना भेटून देखील देत नसतं. इतकेच नव्हे तर भूमिका गरोदर असताना देखील तिला त्रास देण्यात आला. भूमिकाला बाळ झाल्यानंतर ती रुग्णालयातून घरी आल्या आल्या तिला ढीगभर कपडे धुवायला लावले. अखेरीस शेजारच्या लोकांना भूमिकेने घाबरत आणि लपत छपत घडलेला सर्व प्रकार सांगितला. शेजारच्या रहिवाशांनी या सगळ्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत तिच्या घरच्यांना कळवले. त्यानंतर औरंगाबादवरुन तिच्या घरचे आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

सध्या भूमिकाचा पती प्रीतम, सासू जीजाबाई, नणंद पल्लवी, प्रियांका यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली असून अधिक तपास आम्ही करत आहोत, असे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले. विशेष म्हणजे या पीडितेचा सासरा कल्याण येथील कंट्रोल कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत आहे. तर पती बँकेत नोकरीला आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news