अवयवदान दिन विशेष : ‘अवयवदान’ एक ‘श्रेष्‍ठदान’

Published on
Updated on

मुंबई :  पुढारी  ऑनलाईन

मानवाचे शरीर  हे क्षणभंगूर आहे…मृत्यूनंतर सारे नष्ट होते… मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर  'अवयव दान ' करा. मृत्यूनंतर  एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो.  तर ३५ लोकांच्या  आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो.  मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी म्‍हणावी तेवढी जागृती  नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे  १०  विविध अवयव आपण दान करू शकतो. फक्त त्यासाठी हवी  पुरेशी  माहिती व  इच्छाश्‍क्‍ती. तरच अवयवदान  शक्‍य आहे. आपण केलेले अवयव दानाने कुणाला तरी जीवदान मिळू शकते. तुमच्या आर्थिक, सामाजिक पातळीच्याही पलीकडे जाऊन  मानव म्‍हणून तुमच्याकडे एक नाही तर अनेक देणग्या आहेत.  त्‍यापैकी अवयवदान हे एक आहे.  त्‍यामुळे 'अवयवदान' हे 'श्रेष्‍ठदान' आहे, असे म्‍हटले तरी वावगे वाटायला नको. 

जागतिक स्‍तरवार आज, १३ ऑगस्‍ट जागतिक अवयवदान दिवस साजरा केला जातो.  यानिमित्‍त अवयवदानाची सुरुवात कधीपासून झाली , अवयवदान प्रकार, आदी माहिती जाणून घेउया. 

अवयवदानाची सुरुवात कधीपासून झाली ?

अमेरिकेतील बोस्टनमध्‍ये  किडनी प्रत्यारोपणानं अवयवदानाचची  सुरुवात झाली.  या शस्त्रक्रियेत एका जुळ्या भावाची किडनी त्याच्या आयडेंटिकल जुळ्या भावाला बसवण्यात आली. त्या आधीही नेत्रदान आणि त्वचादान सुरू झालं होतं. पण किडनी प्रत्यारोपण हे एक मोठं पाऊल होतं.

अवयवदान म्हणजे नक्की काय? ते कसे करतात?

एखाद्या जिवंत अथवा मृत मानवी शरीरातील अवयव वा टिशूज (tissues) त्या शरीरातून काढून दुसर्‍या मानवी शरीरात त्यांचे प्रत्यारोपण करणे म्हणजे अवयवदान. याला दान म्हणतात कारण असे करण्याबाबत त्या दात्याची संमती घेतलेली असते.

अवयवदान करणे भारतात कायदेशीर आहे का?

अवयवदान करणे भारतात कायदेशीर आहे.  Transplantation of Human Organs Act (THOA), 1994 या अ‍ॅक्टद्वारे अवयवदान आणि 'ब्रेनडेड' या संकल्पना स्विकारल्या गेल्या आहेत. मात्र अवयव खरेदी-विक्रीवर कायद्याने बंदी आहे. म्हणजे या व्यवहारात पैशाची देवाणघेवाण कायदेशीर नाही.

कोणकोणते अवयव दान करता येतात?

हृदय (heart), यकृत (liver), मूत्रपिंड (kidneys) यासारखे अवयव (organs) तसेच त्वचा, कॉर्निया, बोन मॅरो सारख्या टीशूज (tissues) दान करता येतात. यातील काही जिवंतपणीही दान करता येतात तर काही मरणोत्तर करता येतात. 

जिवंत असताना आपण आपल्या आरोग्याला सांभाळून आपण किडनी, रक्त, बोन मॅरो, बोन्स, त्वचा, ब्लड सेल्स आणि काही अवयवांचा (यकृत, फुफ्फुसं आणि दुर्मिळ केसेस मध्ये स्वादुपिंड आणि आतडी) काही भाग दान करता येतो.

तर मरणोत्तर अवयवदानात वर दिलेल्यां व्यतिरीक्त अजून कितीतरी अवयव आणि टीशूज दान करू शकतो – फुफ्फुसं (lungs), आतडी (intestine), स्वादुपिंड (pancreas), हृदयातील व्हॉल्व्हज (heart valves), हृदय, रक्तवाहिन्या असे एकूण ३४ अवयव व टिशूज दान करता येतात. 

अवयवदान करण्‍याचे दोन प्रकार : 

जागतिक पातळीवर अवयवदानाकरता स्वसंमतीच्या 'ऑप्ट इन' आणि 'ऑप्ट आऊट' या दोन पध्दती आहेत.

 १. ऑप्ट-इन पद्धत

ऑप्ट-इन पद्धतीत ज्या दात्यांनी खास फॉर्म भरून आपली संमती जाहीर केली असेल अशांनाच दाते समजण्यात येते. भारतात 'ऑप्ट-इन' ही पद्धत अवलंबली जाते. 

२.ऑप्ट-आऊट पद्धत

ऑप्ट-आऊट पद्धतीत 'अवयवदान करायचे नाही' असा नकार दिला नसलेल्या उर्वरीत सगळ्यांना ते दाते आहेत असं गृहीत धरलं जातं. ऑप्ट-आऊट पध्दतीचा स्वीकार केल्यास दात्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढते. उदा. जर्मनीसारख्या देशात ऑप्ट-इन पध्दत आहे. 

किती तासांत अवयव प्रत्यारोपण  करणे शक्य  आहे ? 

 डोळे  :    काही महिने

 त्वचा  : सहा तासांच्या आत

 फुफ्फुस  :  सहा तास आत

 किडनी  :    ४८ तास आत

अवयवदान  कोण करू शकते ?

किमान 3वर्ष व त्याहून अधिक कोणीही व्‍यक्‍ती अवयवदान करु शकते. 

लाईफ  सपोर्ट सिस्टीमवरील ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास ,त्यांचे अवयवदान होऊ शकते.

नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचे अवयवदान करता येऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news