दिर्घकाळ फोनची बॅटरी टिकण्‍यासाठी असे करा चार्जिंग  | पुढारी

दिर्घकाळ फोनची बॅटरी टिकण्‍यासाठी असे करा चार्जिंग 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

आज प्रत्‍येकांकडे स्‍मार्टफोन आहेत. त्‍यातही इंटरनेटचा वाढता वापर यामुळे फोनचे चार्जिंग संपत असते. त्‍यामुळे फोनचा वापर आणि चार्जिंग हा सगळ्‍यांसाठी महत्‍त्‍वाचा प्रश्‍न बनला आहे. त्‍यातही  फोनच्या बॅटरीच्या ब्लास्टच्‍या घटना घडत असतात.  अशावेळी आपल्या मोबाईल बॅटरीच्या चार्जिंगवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. 

फोन चार्जिंगविषयी नेहमी नवनवीन गोष्टी समोर येत असतात. अनेकवेळा असे कानावर येते, फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये. यामुळे बॅटरी आणि फोन खराब होतो. परंतु असे  होत असेल तर घाबरण्याची गरज नाही. स्मार्टफोन आणि बॅटरीचे टेस्ट करणार्‍या एका कंपनीने सांगितले आहे की, फोन पूर्ण  चार्ज झाल्यानंतर चार्जर ऑटोमॅटिकली टर्नऑफ होतो.

फोन चार्जिंग करताना घ्‍यावयाची काळजी : 

१. तुम्हाला चांगली बॅटरी लाइफ हवी असेल तर तुम्ही थोडा-थोड्या वेळात फोन चार्ज करावा. 

२. १० टक्के किंवा २० टक्के चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीला कोणतेही नुकसान होत नाही. 

३. तुम्हाला बॅटरी लाइफ कमी करायची नसेल तर बॅटरी रेड झोनमध्ये जाऊ देऊ नका. जास्तीत- जास्त स्मार्टफोनमध्ये १५ % हा रेड झोन असतो.

४.  फोनची बॅटरी १५  टक्के झाल्यावर फोन चार्जिंगला लावा. बॅटरी ६५ ते ७५ टक्के ठेवण्याचा प्रयत्न करा. 

५. जर तुम्ही फोन वारंवार चार्ज करु शकत नसाल तर पावरबँक सोबत ठेवा. 

६.  फोन वारंवार १००  टक्के चार्ज करु नका. ९५  टक्के चार्ज करणे योग्‍य आहे. 

 

Back to top button