history of silver gold: पृथ्वीवर ढीगभर धातू.. मात्र मानवासाठी सोनं चांदीच का इतकं महत्वाचं?

हजारो वर्षापासून फक्त सोनं आणि चांदी या धातूंचीच मानवामध्ये एवढी क्रेज का आहे? हे दोन धातूच मुल्य, सौंदर्य आणि संपत्तीचं प्रतिक कसे काय बनले?
history of silver gold
history of silver goldpudhari photo
Published on
Updated on

Gold Silver Metal Story: या पृथ्वीतलावर जवळपास ९५ धातू आहेत. यात लोह, तांबे, अॅल्युमिनियमपासून अत्यंत दुर्मिळ असा प्लॅटिनम धातू देखील आढळतो. मात्र या सर्व धांतूमंध्ये हजारो वर्षापासून फक्त सोनं आणि चांदी या धातूंचीच मानवामध्ये एवढी क्रेज का आहे? हे दोन धातूच मुल्य, सौंदर्य आणि संपत्तीचं प्रतिक कसे काय बनले?

इजिप्त, रोम, भारत. चीन आणि जगातील इतर ठिकाणी देखील देवी देवतांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी दागिने तयार केले जातात. चलनासाठी नाणी तयार केली जातात. आज देखील लग्नात सोने चांदीची डिमांड मोठी असते. आधुनिक जगात गुंतवणुकीसाठी देखील सोने चांदी हे सर्वात सुक्षित मानलं जातं. या दोन धातूमध्ये असं काय आहे जे इतर ९३ धातूंमध्ये नाहीये?

टिकाऊ धातू

सोनं आणि चांदीला एवढी मागणी असल्याचं कारण अत्यंत शास्त्रीय आहे. सोन आणि चांदी हे दोन नोबेल धातू म्हणून ओळखले जातात. म्हणजे या धातूंवर हवा, पाणी, अॅसिड किंवा आद्रता यांचा कोणताही परिणाम होत नाही. हे धातू या गोष्टींसोबत सहजासहजी प्रतिक्रिया करत नाहीत. सोनं हा सर्वात निष्क्रिय धातू आहे. हा ऑक्सिजनशी प्रतिक्रिया करत नाही. हा धातू गंजत नाही. हजारो वर्षे या धातूंची चमक कायम राहते. चांदी थोडी प्रतिक्रिया करते. सल्फरमुळे चांदी काळी पडते. मात्र इतर धातूंच्या तुलनेत ही प्रतिक्रिया खूप कमी असते.

दुसरीकडं लोखंड हवेशी रासायनिक प्रतिक्रिया लगेच करते आणि ते गंजते. तांबे हे हिरवे पडते. अॅल्युमिनियमवर ऑक्साईडचा थर जमा होतो. त्यामुळं प्राचीन काळापासून लोकं कबरीत सोने चांदीचे दागिने पुरून ठेवत होते. हजारो वर्षे जरी झाले तरी त्यांची चमक कमी होत नव्हती. ही रासायनिक स्थिरता या धातूंना अमरत्व प्राप्त करून देते.

नैसर्गिक शुद्धता

प्राचीन काळात मानवाला धातू वितळवण्याचे तंत्र माहिती नव्हते. अनेक धातू ऑक्साईड किंवा या सल्फाईड स्वरूपात मिळत होते. यातून धातू काढण्यासाठी उच्च तापमानाची गरज होती. मात्र सोने आणि चांदी नेहमी शुद्ध स्वरूपात मिळतात. ते नदी, डोंगरात छोट्या छोट्या तुकड्यात मिळतात. त्यांना उचलून तुम्ही त्याचा थोडा आकार बदलून वापरू शकत होता.

त्यामुळेच ५००० ते ६००० वर्षापासून मानवाने चोने आणि चांदीचा वापर सुरू केला. सोने चांदी वापराचे सर्वात जुने उदाहरण हे बल्गेरियाच्या वार्ना संस्कृतीत आढळते. चांदीचा वापर जवळपास इसवीसन पूर्व ४००० वर्षापूर्वी सुरू झाला आहे.

उपलब्धता

जरी सोनं आणि चांदी हे धातू दुर्मिळ असले तरी त्यांची उपलब्धता फार कमी नाहीये. पृथ्वीवर सोने आणि चांदीचे अनेक साठे आहेत. सोने आणि चांदी इतका दुर्मिळ आहेत जेणेकरून त्यांचे मुल्य चांगले राहिली. मात्र इतकेही दुर्मिळ नाहीत की ते मिळणं अशक्यच ठेरले.

सोन्याचा पिवळा रंग आणि चांदीचा पांढरी चकाकी यामुळे ते जास्त आर्षक दिसतात. त्यामुळे देखील त्यांची मोठी मागणी असते.

मोबिलिटी आणि डक्टिलिटी

सोने एका ग्रॅमच्या पातळ शीटमध्ये देखील ठेवता येते. चांदी विजेचा आणि उष्णतेचा चांगला वाहक आहे. ती सहजासहजी पिघळत नाही. सोने पिघवळण्यासाठी १०६४ डिग्री उष्णता तर चांदी पिघळवण्यासाठी ९६२ डिग्री सेल्सियस उष्णाता लागते. त्यामुळे याचे दागिने सुरक्षित राहतात.

सोने चांदी हे खराब होत नाहीत. त्यामुळे संपत्तीच्या स्वरूपात ते जमा करून ठेवण्याचा योग्य पर्याय ठरतात. या धातूंचे छोटे छोटे तुकडे करून ठेवता येऊ शकतात. नकली धातू तयार करणं अवघड असल्यानं जगातील प्रत्येक संस्कृतीनं सोने आणि चांदी मुल्यवान म्हणून मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news