

सहल कोठेही असो तुमचा ट्रॅव्हल पार्टनर जर क्वेस्ट टुर्स (Quest Tours) असेल तर ही ट्रिप संस्मरणीय ठरणार हे नक्की. टुर्स अँड ट्रॅव्हल विश्वातील एक विश्वसनीय नाव असलेले क्वेस्ट टुर्ससोबत प्रवास करण्याचे आता आणखी एक कारण आहे, ते म्हणजे वेगवेगळ्या ट्रिप्ससाठी भरघोस डिस्काऊंट. क्वेस्ट टुर्स दैनिक पुढारी आयोजित टुर्स अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शनात सहभागी असून, प्रदर्शन काळात म्हणजेच १० ते १२ ऑगस्टमध्ये ट्रिप बुकिंग करणाऱ्या पर्यटनप्रेमींना या स्पेशल डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात हे प्रदर्शन सुरू आहे.
क्वेस्ट टुर्सच्या राज्यात २५०पेक्षा जास्त शाखा आहेत. युरोप, दुबई, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया तसेच भारतातील किती तरी डेस्टिनेशन सहली क्वेस्ट टुर्स आयोजित करते. अत्याधुनिक सुविधा, कोल्हापूर ते कोल्हापूर प्रवास, वाजवी दरातील पॅकेज, तज्ज्ञ स्टाफ अशा किती तरी वैशिष्ट्यांमुळे क्वेस्ट टुर्स नावारूपाला आले आहे.
दैनिक पुढारी आयोजित टुर्स अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शाला भाग देणाऱ्या पर्यटनप्रेमींसाठी क्वेस्ट टुर्सने भरघोस डिस्काऊंट दिलेले आहेत. हे डिस्काऊंट मर्यादित कालावधीसाठी असल्याने दैनिक पुढारीच्या टुर्स अँड ट्रॅव्हल प्रदर्शनात क्वेस्ट टुर्सच्या स्टॉल क्रमांक १५ ला भेट देऊन तुमची ट्रिप नक्की करा.
अमेझिंग दुबई - दुबईची ५ दिवस आणि ६ रात्रींची ही ट्रिप आता फक्त ८६ हजार रुपयांत करता येणार आहे. या ट्रिपचे मूळ शुल्क ९५ हजार रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे या ट्रिपमध्ये राहण्याची सुविधा ही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
इतर डेस्टिनेशन - अंदमान (५ रात्री आणि ६ दिवस), राजस्थान स्पेशल (११ रात्री आणि १२ दिवस), काशी-गया-प्रयाग (६ रात्री आणि ७ दिवस), गुजरात (१० रात्री आणि ११ दिवस), थायलंड-मलेशिया-सिंगापूर (१० रात्री ११ दिवस)