YouTube Down: यूट्यूब अचानक बंद पडलं? व्हिडिओ लोड होत नाहीत; हजारो युजर्स त्रस्त, नेमकं काय घडलं?

YouTube Down: जगभरातील अनेक युजर्सनी यूट्यूबवर व्हिडिओ लोड न होणे, अॅप क्रॅश होणे आणि YouTube Studio मध्ये एरर येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
YouTube Down
YouTube DownPudhari
Published on
Updated on

YouTube Down: जगभरातील करोडो युजर्ससाठी यूट्यूब अचानक ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेक देशांमधील युजर्सनी व्हिडिओ सुरू न होणे, होमपेज रिकामे दिसणे, अॅप अचानक बंद पडणे आणि YouTube Studio मध्ये एरर येत असल्याच्या तक्रारी केल्या. विशेषतः व्हिडिओ अपलोड करणाऱ्या क्रिएटर्सना मोठा फटका बसल्याचे दिसून आले.

अनेक युजर्सनी सोशल मीडियावर पोस्ट करत “Something went wrong” आणि “Server error” असे मेसेज दिसत असल्याचे सांगितले. काहींना व्हिडिओ लोड होत नव्हते, तर काहींचे होमपेज पूर्णपणे ब्लँक दिसत होते. यूट्यूबवर नियमित काम करणाऱ्या क्रिएटर्सनी analytics पाहण्यात, व्हिडिओ अपलोड करण्यात आणि स्टुडिओ access मध्ये अडचणी येत असल्याचे सांगितले आहे.

आउटेज ट्रॅक करणाऱ्या वेबसाइट्सनुसार, हजारो युजर्सनी यूट्यूबमध्ये बिघाड झाल्याची नोंद केली आहे. त्यामुळे काही काळ “यूट्यूब डाउन झालं का?” असा प्रश्न सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसला. विशेषतः X (पूर्वीचे ट्विटर) वर अनेकांनी स्क्रीनशॉट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली.

मात्र, ही समस्या नेमकी किती युजर्सना आहे आणि कोणत्या भागांत जास्त परिणाम दिसतोय, याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही ठिकाणी मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीवर समस्या जाणवत असल्याचे सांगितले जात आहे, तर काही युजर्सकडे सेवा व्यवस्थित सुरू असल्याचंही दिसत आहे.

दरम्यान, यूट्यूबची मालकी असलेल्या गुगलकडून या कथित outage बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा तात्पुरता तांत्रिक बिघाड आहे की मोठ्या outage ची सुरुवात, याबाबत संभ्रम कायम आहे.

विशेष म्हणजे, याआधी फेब्रुवारी २०२६ मध्येही यूट्यूबला मोठ्या जागतिक outage चा सामना करावा लागला होता. त्या वेळी recommendation system मध्ये बिघाड झाल्यामुळे YouTube, YouTube Music, YouTube Kids आणि YouTube TV वर व्हिडिओ दिसत नव्हते. त्या outage दरम्यान जगभरातून तीन लाखांहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या.

सध्या यूट्यूब वापरताना अडचण येत असल्यास अॅप refresh करणे, cache clear करणे किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जात आहे. समस्या कायम राहिल्यास अधिकृत अपडेटची वाट पाहणेच योग्य ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news