WhatsApp कॉलिंगचं नवं युग; जाणून घ्या नवीन फीचर!

WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या वापरकर्त्यांना एक नवीन फीचर सादर केले आहे.
WhatsApp Calling
WhatsApp Calling
Published on
Updated on

WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या वापरकर्त्यांना एक नवीन फीचर सादर केले आहे. या फीचरमुळे आता तुमच्या फोनवरचे सर्व कॉल्स थेट WhatsApp वर येणार आहेत आणि विशेष म्हणजे, यासाठी नंबर सेव्ह असणं आवश्यक नाही! जर समोरची व्यक्ती WhatsApp वर असेल आणि त्याचे इंटरनेट ऑन असेल, तर तो तुमच्याशी थेट WhatsApp वरून कॉल करू शकतो.

जाणून घ्या हे कसं काम करतं?

हे फीचर इतकं सोपं आहे की, त्यासाठी तुम्हाला WhatsApp अ‍ॅप उघडण्याचीही गरज भासत नाही. एकदा तुमच्या iPhone मध्ये सेटिंग बदलल्यानंतर, तुमचे सर्व कॉल्स WhatsApp वरून येऊ लागतात, अगदी अशा नंबरकडूनही जे तुमच्या फोनमध्ये सेव्ह नाहीत.

सेटिंग कशी करायची?

  1. सर्वप्रथम Apple App Store वर जाऊन WhatsApp चे लेटेस्ट अपडेट इन्स्टॉल करा

  2. नंतर iPhone च्या Settings मध्ये जा

  3. तिथे Default Apps चा पर्याय निवडा

  4. त्यामध्ये Calling App म्हणून WhatsApp निवडा

हे झालं की, तुमच्या कॉलिंगसाठी WhatsApp डिफॉल्ट अ‍ॅप होईल!

हे कसं शक्य आहे?

आपल्या फोनवर आणि WhatsApp वर एकाच वेळी वेगवेगळ्या कॉल्समुळे अनेकदा गोंधळ होतो. पण आता, iPhone यूजर्स WhatsApp ला कॉलिंगसाठी डिफॉल्ट अ‍ॅप म्हणून सेट करू शकतात. यामुळे, जेव्हा तुम्ही कॉल करता किंवा कोणी तुम्हाला कॉल करतो, तेव्हा तो कॉल WhatsApp वरूनच होतो. हे फीचर सध्या फक्त iOS साठीच उपलब्ध आहे. Android वापरकर्त्यांना थोडा वेळ थांबावं लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news