

Are You Dead App: जर तुमचा मोबाईल फोन दर दोन दिवसात तुम्हाला एक प्रश्न विचारेल... तुम्ही जिवंत आहात का? जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तो तुमच्या कुटुंबियांना अलर्ट पाठवले. ऐकायला खूप विचित्र वाटतंय ना.. मात्र हे चिनी अॅप सध्या लाखो लोकं डाऊनलोड करत आहेत. त्यामुळे हे अॅप सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
या अॅपचं नाव आहे Are You Dead हे अॅप एकदम साधं काम करतं. हे अॅप वापरणाऱ्यांन ४८ तासात तुम्ही ठीक आहात का हे एक बटन टॅप करायला सांगतं. जर सलग दोन वेळा तुम्ही चेक इन केलं नाही तर हे अॅप स्वतःहून निवडलेल्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरला मेसेज पाठवतं की काहीतरी गडबड झाली आहे.
हे अॅप एकटे राहणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. अनेक मोठ्या शहरात काम करणाऱ्या तरूणांना, कुटुंबांपासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना किंवा वयस्कर व्यक्ती ज्यांची मुले दुसऱ्या शहरात राहतात त्यांच्यासाठी तयार करण्यात आलं आहे. हे काही उच्च तंत्रज्ञान नाही मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एक आश्वासक अॅप म्हणून समोर येत आहे.
विशेष म्हणजे या अॅपचे नाव Are You Dead हे खूपच रंजक आहे. हे थेट मात्र आश्चर्यचकीत करणारं आहे. त्यामुळं हे अॅप सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. कोही लोकं यावरून विनोद देखील करत आहेत. तर काही लोकं आज शहरातील जीवनाचे हे एक कटू सत्य झालं आहे अशी प्रतिक्रिया देत आहेत.
या अॅपचा इंटरफेस अत्यंत साधा आहे. कोणतेही चॅट, सोशल फिचर किंवा मोठी प्रोफाईल नाही. फक्त एक बटन 'I’m Alive टेक जाणकारांच्या मते त्यांचा साधेपणाच त्याची ताकद आहे. युजरवर कोणताही अतिरिक्त ताण नाही मात्र गरज पडल्यास अलर्ट सिस्टम काम करते.
खरं तर चीनची बदलती सामाजिक पार्श्वभूमीकडे हे अॅप लक्ष वेधते. मोठ्या शहरात लाखो लोकं एकटी रहात आहेत. ती कुटुंबापासून दूर आहेत. शेजाऱ्यांशी अत्यंत कमी संभाषण होत आहे. अशा परिस्थिती जर त्या व्यक्तीसोबत काही झालं तर ते खूप काळानंतर लोकांना समजतं. हीच भीती या अॅपला एवढी मागणी निर्माण होण्यामागचं कारण आहे.
मात्र या अॅपनंतर आता तंत्रज्ञान नात्यांची जागा घेत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जे काम यापूर्वी कुटुंब आणि समाज करत होता ते एक अॅप करत आहे. काही लोकं याला लोनलीनेस टेक म्हणत आहेत. तुमच्या एकाकीपणाला टेक्नॉलॉजीद्वारे थोडं मॅनेजेबल बनवण्याचा हा प्रयत्न आहे.
मात्र जाणकार आपण कोणत्या जगाच्या दिशेने जात आहोत याच्यावर देखील चर्चा करत आहेत. आता माणसांना जिवंत असल्याचा पुरावा देखील मोबाईल अॅप द्वारे द्यावा लागत आहे.
सध्याच्या घडीला तरी हे अॅप एक फक्त टेक अॅप नाही तर सध्याच्या शहरी जीवनचा, संकुचित होत चाललेली नाती अन् संपर्क याचा आरसा झाले आहे. ही परिस्थिती फक्त चीनमधील नाही तर संपूर्ण जगातील मेट्रोसिटीमधील ही परिस्थिती आहे.