POCO C85 5G |भारतीय तरूणांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला POCO चा C85 5G स्मार्टफोन लाँच

हा स्मार्टफोनमध्ये शक्‍ती, कार्यक्षमता व नाविन्‍यता ही प्रमुख वैशिष्टये असल्याचे देखील कंपनीने म्हटले आहे
POCO C85 5G
POCO C85 5G
Published on
Updated on

मुंबई: पोको हा भारतातील आघाडीचा ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड. नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या POCO C85 5G सह पुन्‍हा एकदा बजेट स्‍मार्टफोन विभागात धुमाकूळ निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे. चालता-फिरता अद्वितीय विश्वसनीयतेची मागणी करणाऱ्या भारतातील तरूणांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा स्‍मार्टफोन सब-₹ १२के श्रेणीमधील मूल्‍याला अद्वितीय स्थिरता व स्‍टाइलसह नव्‍या उंचीवर घेऊन जातो.

सर्वोत्तम बॅटरी अनुभवासाठी पोको सी८५ ५जी (POCO C85 5G ) मध्‍ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते. ३३ वॅट फास्‍ट चार्जिंगसह स्‍मार्टफोन फक्‍त २८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍के चार्ज होऊ शकतो, ज्‍यामधून तुम्‍ही सतत कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईसला पोर्टेबल पॉवर बँक बनवते, ज्‍यासह मोबाइल्‍स, टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स, स्‍मार्टवॉचेस् आणि इतर अॅक्‍सेसरीज चार्ज करता येऊ शकतात.

भारतीयांची जीवनशैली नेहमी व्‍यस्‍त असते. हा स्‍मार्टफोन प्रभावी स्‍टाइल आणतो, ज्‍यासह तुम्‍ही सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. या स्‍मार्टफोनमध्‍ये स्‍लीक, आधुनिक डिझाइनसह क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशिंग आहे. हा स्‍मार्टफोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्‍लॅक या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच एचडी+ डिस्‍प्‍लेसह १२० हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट सुलभ स्‍क्रॉलिंग, सर्वोत्तम गेमिंग व आकर्षक व्हिज्‍युअल्‍स देते. मीडियाटैक डायमेन्सिटी ६३०० ची शक्‍ती (जवळपस ४५०के+ अंतूतू स्‍कोअर) आणि जवळपास १६ जीबी टर्बो रॅम आहे. अँड्रॉईड १५ आऊट ऑफ द बॉक्‍सवरील हायपरओएस २.२ वर संचालित या स्‍मार्टफोनमध्‍ये आयपी६४ धूळरोधक व जलरोधक, ५० मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्‍सल सेल्‍फी शूटर आहे, ज्‍यासह कोणत्‍याही प्रकाशामध्‍ये सुस्‍पष्‍टपणे फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करता येतात.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत पोको इंडियाचे जीटीएम हेड अंकित सिंग म्‍हणाले, ''आम्‍हाला नवीन पोको सी८५ ५जी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या डिवाईसमध्‍ये शक्‍ती, कार्यक्षमता व नाविन्‍यता आहे, जो बजेट स्‍मार्टफोन श्रेणीमधील मर्यादांना दूर करतो. ६००० एमएएच बॅटरी, ३३ वॅट फास्‍ट चार्जिंग आणि १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंगसह सेगमेंटमधील सर्वोत्तम बॅटरी अनुभव देणाऱ्या या डिवाईसमध्‍ये सेगमेंटमधील सर्वात मोठे ६.९ इंच डिस्‍प्‍ले आहे आणि हा स्‍मार्टफोन किफायतशीर आहे. पोको सी८५ ५जी तुम्‍हाला व्‍यस्‍त कामकाजामध्‍ये मदत करण्‍यसाठी, दीर्घकाळापर्यंत मनोरंजनाचा आनंद देण्‍यासाठी आणि तडजोड न करता सर्वात मागणीदायी अॅप्‍स सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसमधील प्रत्‍येक वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना मुक्‍तपणे व आत्‍मविश्वासाने फ्लॉण्‍ट युअर पॉवर देण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आले आहे.''

पोको इंडियाचे मार्केटिंग हेड केन शेखर म्‍हणाले, ''पोकोमध्‍ये आमचे आमच्‍या डिवाईसेसमध्‍ये, तसेच आम्‍ही देणाऱ्या अनुभवांमध्‍ये दीर्घकाळापर्यंत पॉवर देण्‍याचे मिशन आहे. पोको सी८५ ५जी सह आम्‍ही अविरत कार्यक्षमतेला आधुनिक डिझाइन आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशसह एकत्र केले आहे, ज्‍यासह वापरकर्ते अभिमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतील. गेमिंग, मनसोक्‍त मनोरंजनाचा आनंद घ्‍यायचा असो किंवा मल्‍टीटास्किंग करायचे असो सी८५ तडजोड न करणारा अनुभव देतो, तसेच वापरकर्त्‍यांना कनेक्‍टेड, उत्‍पादनक्षम आणि आत्‍मविश्वासाने नियंत्रण ठेवण्‍यास मदत करतो.''

POCO C85 5G ला सर्वोत्तम बनवणारी वैशिष्‍ट्ये

• सर्वोत्तम बॅटरी अनुभव, जेथे ६००० एमएएच बॅटरी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते, तसेच ३३ वॅट फास्‍ट चार्जिाग आणि अत्‍यंत व्‍यावहारिक १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग वैशिष्‍ट्य आहे.

• उत्तम फिलसाठी क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी, प्रीमियम ड्युअल-टोन फिनिश आणि विशिष्‍ट कॅमेरा डेको आहे.

• सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच डिस्‍प्‍लेसोबत १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सुलभ स्‍क्रॉलिंग, स्‍वाइपिंग, गेमिंग आणि मनसोक्‍त मनोरंजनाचा आनंद देते.

•मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० ची शक्‍ती असलेला हा डिवाईस ४५०के च्‍या अंतूतू स्‍कोअरसह उत्तम कार्यक्षमता देतो. हा डिवाईस अँड्रॉईड १५ आऊट ऑफ द बॉक्‍सवरील हायपरओएस २.२ वर संचालित आहे आणि सेगमेंटमधील सर्वोत्तम सॉफ्टवेअर कटिबद्धता - २ अँड्रॉईड अपग्रेड्स आणि ४ वर्ष सिक्‍य‍ुरिटी अपडेट्स देतो. 

• पोको सी७५ च्‍या तुलनेत पोको सी८५ अधिक शक्तिशाली बॅटरी, अपग्रेडेड मोठे व आकर्षक डिस्‍प्‍ले आणि प्रीमियम क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक डिझाइनसह मोठी झेप आहे. हा स्‍मार्टफोन हातामध्‍ये सहजपणे मावतो. 

उपलब्‍धता आणि लाँच ऑफर्स

१६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर पोको सी८५ च्‍या विक्रीला सुरूवात होईल, त्‍याची सुरूवातीची किंमत ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १०,९९९ रूपये*, ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरएिण्‍टसाठी ११,९९९ रूपये* आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३,४९९ रूपये* आहे. लाँच ऑफरचा भाग म्‍हणून ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्सचा वापवर करत १,००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा आनंद घेऊ शकतात किंवा पात्र डिवाईसेसवर १,००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनसचा अवलंब करू शकतात. तसेच, क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर ३ महिने नो-कॉस्‍ट ईएमआय उपलब्‍ध आहे. वरील ऑफर्स फक्‍त विक्रीच्‍या पहिल्‍या दिवशी लागू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news