पुढारी ऑनलाईन डेस्क
OpenAI द्वारे विकसित केलेले एआय चॅटबॉट ChatGPT डाउन झाल्याच्या तक्रारी यूजर्संनी केलेल्या आहेत. अनेक यूजर्संनी ओपन एआयच्या चॅटजीपीटीमध्ये ॲक्सेस मिळवताना समस्या येत असल्याचे म्हटले आहे. OpenAI ने सध्याचे आउटेज हे अंशतः स्वरुपाचे असल्याचा खुलासा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर केला आहे.
आणखी एक समस्या निर्माण झाली होती, जी मुख्यतः वर्कस्पेस ॲनालिटिक्स टॅबवर परिणाम करत होती. ChatGPT Enterprise साठी वर्कस्पेस ॲनालिटिक्स टॅब सध्या कोणताही डेटा परत करत नाही. आम्ही याचे मूळ कारण शोधले आहे. आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत, असे Open AI ने पुढे नमूद केले आहे.
त्यांच्या स्टेटस पेजनुसार, या समस्येचे निराकरण करण्यात आले असून OpenAI ने प्रभावित यूजर्संच्या काही भागासाठीचा डेटा रिस्टोअर्ड केला आहे आणि उर्वरित यूजर्संच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम सुरु आहे. दरम्यान, यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी सुमारे १० तास लागतील.
आउटेजची नोंद घेणाऱ्या Downdetector.com वर सुमारे ७७ यूजर्संनी ChatGPT ॲक्सेस मिळवताना समस्या आल्याचे नमूद केले आहे. सुमारे १९ टक्के यूजर्संनी ChatGPT वेबसाइटबाबत समस्या नोंदवल्या आहेत. तर ४ टक्के यूजर्संनी ॲपबाबत समस्या नोंदवली आहे.