

OpenAI या कंपनीने आपले नवीन ChatGPT 5.1 व्हर्जन लॉन्च केले आहे आणि तो हळूहळू सर्व युजर्ससाठी उपलब्ध होत आहे. हा नवा मॉडेल मागील आवृत्तीपेक्षा जास्त मानवीय (नैसर्गिक), प्रेमळ (उबदार) आणि तुमच्या बोलण्याच्या टोननुसार स्वतःला जुळवून घेणारा असेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जे युजर्स ChatGPT Go चा विनामूल्य (फ्री) व्हर्जन वापरतात, त्यांनाही हा नवीन 5.1 मॉडेल वापरता येणार आहे.
कंपनीच्या मते, GPT 5.1 आता पूर्वीपेक्षा जास्त समजदार आहे. तो तुमच्या प्रश्नाची, मूडची आणि बोलण्याच्या पद्धतीची चांगली ओळख करू शकतो.यामध्ये दोन वेगळे प्रतिसाद (रिस्पॉन्स) देण्याचे मोड समाविष्ट असणार आहेत. सामान्य आणि सोप्या प्रश्नांची उत्तरे तो झटपट (Instant) देतो. जेव्हा प्रश्न कठीण किंवा गुंतागुंतीचा असतो, तेव्हा तो 'विचार करून' (Thinking) जास्त चांगली आणि तपशीलवार माहिती उपलब्ध करून देतो.
हे एक नवीन आणि महत्त्वाचे फीचर आहे. याच्या मदतीने तुम्ही ChatGPT चा आवाज, बोलण्याची पद्धत आणि अंदाज कसा असावा हे निवडू शकता. उदा. तुम्ही त्याला मैत्रीपूर्ण (Friendly), व्यावसायिक (Professional), स्पष्ट (Direct) किंवा विनोदी (Funny) पद्धतीने बोलण्यास सांगू शकता. यासाठी एकूण 8 'पर्सनॅलिटी स्टाईल्स' जोडल्या गेल्या आहेत.
भारतात 4 नोव्हेंबरपासून ChatGPT Go मोफत उपलब्ध झाल्यानंतर, हा प्रश्न अनेकांना पडला होता. गुरुवारपासून (4 नोव्हेंबर नंतर), Pro, Plus, Go आणि Business अशा सर्व प्रकारच्या युजर्संसाठी ChatGPT 5.1 उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे फिचर हळूहळू रोलआउट (उपलब्ध करण्याची प्रक्रिया) केले जात आहे, जेणेकरून सर्व्हरवरील लोड नियंत्रित राहील. जुने GPT-5 मॉडेल पुढील तीन महिन्यांसाठी 'लेगसी मॉडेल' म्हणून ठेवले जातील, जेणेकरून युजर्संना नवीन आणि जुन्या मॉडेलमध्ये तुलना करता येईल.