

पाणी हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरजही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र, गोड्या पाण्याची संसाधने दुर्मीळ आहेत. हे गोडे पाणी सिंचनासाठी मुख्य घटक आहे. पाण्याची टंचाई दूर करण्याची निकड महत्त्वाची आहे. गोड्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने कृषी व्यवसायासाठी केला जातो. त्यादृष्टीने कृषी क्षेत्राला प्रगत सिंचन प्रणाली तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे. पृथ्वीवरील 75 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असूनही फक्त 2.5 टक्के गोडे पाणी उपलब्ध आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे जगातील 70 टक्के पिण्याचे पाणी शेतीसाठी दिले जाते. ए.आय.आणि इंटरनेट ऑफ थिंग्जवर आधारित तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जलनियंत्रण, ठिबक सिंचन, जलसंचय विषयातील व्यवस्थापन आता शेतीमध्ये करणे शक्य झालेले आहे.पारंपरिक पद्धतीत पाण्याचा अतिवापर, रोपांच्या मुळापर्यंत पाणी न पोहोचणे या समस्या शेतीचे मोठे नुकसान करत आहेत. ज्यामुळे योग्य सिंचनासाठी आधुनिक उपकरणाची उपयुक्तता आवश्यक असल्याचे जाणवू लागले.
शेती संबंधित आय.ओ.टी.बेस्ड ऑटोमेटेड डेटा जनरेशनचा वापर करून मातीची आर्द्रता, तापमान, उंची इ.आणि ङठ, छरर्ळींश इरूशी, डतच्, आणि दॠइेेीीं या मशिन लर्निंग मॉडेलच्या आधारे मूल्यांकन केले जाते.डेटा अॅनालिटिक्स, ऑटोमेशन, आय.ओ.टी. सेन्सर बेस्ड ऑटोमॅटिक डेटा जनरेशन, ड्रोन, हायड्रोपोनिक्स,कृत्रिम प्रकाश आणि ए.आय.बेस्ड हाय रिझोल्यूशन इन्फ्रारेड कॅमेरे रिअल-टाइम निरीक्षणे या तंत्रज्ञानामुळे दर्जात्मक शेतीमधील त्याची भूमिका अधोरेखित केली जात आहे.ए.आय.ऑपरेट करणार्या प्रणाली मानवांप्रमाणे विचार करतात. हे तयार मॉडेल अचूकतेसह उत्कृष्ट कामगिरी करतात. महत्त्वाचे म्हणजे हे तंत्रज्ञान पाणीटंचाईच्या जागतिक संकटात शेतीतील पाण्याच्या योग्य व पुरेपूर उपयोगासाठी योगदान देते.
पारंपरिकरीत्या शेतकरी हाताने पंप चालू करून सिंचन देत असत. पण आता पाण्याचे पंप चालू बंद करणे पण स्मार्ट आय.ओ.टी.बेस्ड ए.आय.सिंचन पद्धतीच्या मदतीने शेतकरी आपोआप स्वयंचलित करू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी दिले जाते. जे अचूक परिणाम देतात. त्यामुळे शेतकर्यांचा वेळ वाचू शकतो आणि तो वेळ इतर कामासाठी वापरू शकतात. हे तंत्रज्ञान थेट झाडांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचवून जास्त पाणी वापर वाचविण्यात मदत करेल.
सिंचनात शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करू शकतात, ही पद्धत पाणी बचतीसाठी ओळखली जाते. तथापि, हे संशोधन ए.आय.आणि मशिन लर्निंगच्या क्षमतांचा वापर करून पारंपरिक पद्धतींच्या मर्यादा ओलांडून ते अधिक प्रभावशाली करण्याचा प्रयत्न करते. ठिबक सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ऑटोमॅटिक सक्षम डेटाचलित यंत्रणा आता उपलब्ध आहे.हे आय.ओ.टी बेस्ड मशिन लर्निंग मॉडेल वातावरणातील तापमानावर अवलंबून जमिनीतील ओलाव्याचा अंदाज लावण्यात लक्षणीय अचूकता दाखवतात. भविष्यात देशभरातील मातीच्या गुणवत्तेतील फरक, पाण्याची उपलब्धता विविध पिकांशी संबंधित अतिरिक्त कच्चा डेटा याचा एकत्रित विचार करून हे तंत्रज्ञान कोणते पीक आपण घेऊ शकतो किंवा कोणते पीक घेऊ नये, यावरही संशोधन सुरू आहे.
या तंत्रज्ञानाचे फायदे खालीलप्रमाणे : 1. मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची बचत, 2. मोठ्या प्रमाणामध्ये खर्चामध्ये बचत,3. मनुष्य ऊर्जेचा योग्य प्रमाणात वापर, 4. वेळेची मोठ्या प्रमाणात बचत, 5. शेती उत्पन्नामध्ये भरघोस वाढ, 6. मातीच्या दर्जामध्ये सुधारणा., 7. फायदेशीर शेती होत असल्यामुळे शेतकर्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ.
या तंत्रज्ञानातील मर्यादा : 1. प्रशिक्षित कामगाराची आवश्यकता, 2. प्रारंभिक गुंतवणूक खर्च जास्त 3. कालानुरूप तंत्रज्ञान व स्वत:ला अपडेट करणे महत्त्वाचे, 4. पारंपरिक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान याची सांगड घालता आली पाहिजे.
या तंत्रज्ञानाचा विस्तार व प्रभाव वाढवण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक : 1. या तंत्रज्ञानाचा वापर करून शासन, शेती क्षेत्रातील सेवाभावी संस्था यांनी याचे प्रात्यक्षिक उदाहरण उभे करावे. 2. तरुण अभियंते व कृषी तंत्रज्ञ यांनी सयुक्तिकरीत्या या तंत्रज्ञानामध्ये भौगोलिक परिस्थितीला अनुसरून नवीन आवश्यक ते बदल करावेत. 3. तंत्रज्ञानावरील खर्च कमी करून सर्वसामान्य शेतकर्याला परवडेल अशा स्वरूपात तंत्रज्ञान उपलब्ध करावे. 4. या तंत्रज्ञानाने शेती करून नफा मिळवलेल्या शेतकर्यांचा पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा व कार्याचा प्रसार केला पाहिजे. 5. तरुण अभियंते व कृषी तंत्रज्ञ यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी आर्थिक पाठबळ व मार्गदर्शन मिळावे.