

पुढारी ऑनलाईन डेस्क : ChatGPT च्या नवीन इमेज जनरेशन क्षमतेमुळे इंटरनेटवर Ghibli-शैलीतील प्रतिमा तयार करण्याची क्रेझ वाढली आहे. मात्र, ही सुविधा सध्या फक्त सशुल्क यूजर्ससाठी उपलब्ध आहे. पण, आता xAI च्या Grok 3 मॉडेलच्या मदतीने तुम्हीही सहजपणे Ghibli-शैलीतील प्रतिमा तयार करू शकता. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. ही सुविधा मोफत आहे.
Grok वेबसाइट किंवा X (पूर्वीचे Twitter) अॅप उघडा आणि Grok आयकॉनवर क्लिक करा.
Grok 3 मॉडेल सक्रिय आहे याची खात्री करा.
तुमची इच्छित प्रतिमा अपलोड करा - यासाठी तळाच्या डाव्या बाजूला असलेल्या पेपर क्लिप आयकॉनवर क्लिक करा.
Ghibli शैलीत रूपांतर करण्यासाठी स्पष्टपणे टेक्स्ट प्रॉम्प्ट लिहा.
तुम्हाला हवी असलेली प्रतिमा मिळेल! जर तुम्हाला ती योग्य वाटत नसेल, तर Grok मध्ये प्रतिमा संपादन करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
OpenAI ने त्यांच्या नवीन GPT-4o मॉडेलमध्ये इमेज जनरेशन आणि एडिटिंगची सुविधा आणल्यानंतर यूजर्स आपले फोटो Ghibli-शैलीत तयार करण्याचा नवा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. या ट्रेंडला इतकी लोकप्रियता मिळाली आहे की, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनीदेखील X वरील प्रोफाइल पिक्चर Ghibli-शैलीत बदलले आहे!
स्टुडिओ Ghibli हा एक प्रसिद्ध जपानी अॅनिमेशन स्टुडिओ असून 1985 मध्ये हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशियो सुझुकी यांनी त्याची स्थापना केली. हा स्टुडिओ आपल्या हाताने रेखाटलेल्या उत्कृष्ट अॅनिमेशनसाठी आणि समृद्ध कथांसाठी ओळखला जातो.