भांडवल बाजारात AI पर्व

AI
भांडवल बाजारात AI पर्व (file photo)
Published on
Updated on

ए.आय. क्रांती मानवी जीवनाचा एक नवा वळण बिंदू ठरते. वित्तीय क्षेत्रातील व विशेषतः भांडवल बाजारातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व गैरवापर अनेकमहत्त्वपूर्ण बदल घडवत असून, जागतिकीकरणाचे नवे तंत्र हे नवी आव्हाने व संधी निर्माण करीत आहे. कोणतेही तंत्र हे वापरकर्त्याच्या उद्देशावर व क्षमतेवर परिणाम घडवून आणत असते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा भांडवल बाजारात वाढता वापर अपरिहार्य होत असून, यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे, संभाव्य अडचणींकडे व निर्माण होणाऱ्या संकटांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

मानवाच्या बौद्धिक क्षमतेचा परिणाम म्हणून संपूर्ण मानव जात रानटी किंवा जंगली अवस्थेपासून आतापर्यंत अधिक संपन्न होत आली आहे. इंग्लंडमधील १८ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीने उत्पादन व्यवस्था व बाजारपेठ विस्तारली. जेम्स वॅटच्या वाफेच्या इंजिनला औद्योगिक क्रांतीचे गतिमान करणारे तंत्र पुढे वीज वापर करून अधिक व्यापक केले. यानंतर झालेली संगणक क्रांती २० व्या शतकाचे स्वरूप बदलवणारी ठरली. जनुकीय संशोधनातून जैवक्रांतीचा पाया घातला गेला आणि आता इंटरनेटच्या प्रसारातून व पूर्वीच्या तंत्रविस्तारातून विकसित झालेल्या मानवी बुद्धिमत्तेस कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त झाली असून, ही ए. आय. (Artificial Intelligence) क्रांती मानवी जीवनाचा एक नवा वळण बिंदू ठरते. यातून होणारे असंख्य बदल सकारात्मक असतील याची हमी देता येत नसल्याने विविध क्षेत्रांत त्याच्यापरिणामांचा व धोरणात्मक बदलांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो!

याला विस्तारणाऱ्या इंटरनेटने एक नवे क्षेत्र खुले झाले. केवळ आपल्या व्यवसायाचे नव्हे, तर इतरांच्या व्यवसायात सहभागी होणे, इतरांचे व्यवसाय ताब्यात घेणे अशाप्रकारची रचनात्मक विध्वंस जी अर्थ विचारवंत जोसेफ शुंपीटर यांनी सांगितली होती त्याचा अनुभव येऊ लागला आहे. ए.आय.च्या वाढत्या वापरातून वित्तीय क्षेत्रात विविध सकारात्मक परिणाम दिसत असून, यातून व्यवसाय कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. विविध कागदपत्रांची तपासणी, नोंदणी यासोबत मशिन लँग्वेजच्या साहाय्याने विश्लेषण, भविष्यकालीन अंदाज या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. अचूकता व वेग यांच्या एकत्रित परिणामातून व्यवसाय विस्तारणे शक्य झाले आहे.

केवळ त्याच त्या पद्धतीने व्यवसाय सेवा देण्याऐवजी नावीन्यपूर्ण आहे चांगले, तरी... कृत्रिम बुद्धिमत्तेचा भांडवल बाजारात वाढता वापर अपरिहार्य होत असून, यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांकडेसंभाव्य अडचणींकडे व निर्माण होणाऱ्या संकटांकडे दुर्लक्ष पद्धतीने. ग्राहककेंद्रित सेवा व अखंडपणे (२४ x ७) सेवा देणे शक्य झाले आहे. हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेचे आपण अनुभवत असणारे फायदे असून, जनरेटिव्ह ए. आय. च्या माध्यमातून भविष्यकाळात अधिक व्यापक परिणाम दिसू लागतील.

आहे चांगले, तरी...

कृत्रिम बुद्धिमत्तेचा भांडवल बाजारात वाढता वापर अपरिहार्य होत असून, यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे, संभाव्य अडचणींकड व निर्माण होणाऱ्या संकटांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ए. आय. च्या वापरातून रोजगारसंधी मोठ्या प्रमाणात बदलणार असून, त्यातून बेरोजगारीचा प्रश्न वाढू लागला आहे. एकूण ६० टक्के रोजगार ए.आय. ने प्रभावित होत असून, उच्च कौशल्य व उच्च वेतन घेणाऱ्यांना याचा सर्वाधिक परिणाम जाणवणार आहे.

भांडवल बाजारात प्रचंड मोठा सांख्यिकी साठा किंवा विदा तितक्याच वेगाने त्याची प्रक्रिया होऊन निर्णय होत असल्याने अत्यंत छोट्या चुकीचे महाभयंकर परिणाम होऊ शकतात. अल्गोरिदमच्या प्रक्रियेत मूळ विदा चुकीचा, अपुरा किंवा मुद्दाम त्रुटी असलेला वापरला गेल्यास सर्व निर्णय प्रक्रिया चुकीची होऊ शकते. विविध क्षेत्रांतून तत्काळ व विपुल प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या माहितीचा तार्किक अन्वयार्थ काढून घेतलेले निर्णय झटपट असतील; पण योग्य असतील याची खात्री देता येत नाही. यातून निर्माण होणारी गतिमानता हायपर ट्रेड जन्मास घालते व त्यातून संपूर्ण जागतिक भांडवल बाजार अस्थिर होण्याच्या, दिवाळखोरीकडे जाण्याचा धोका निर्माण करते.

वित्तीय स्थैर्याचे वा आव्हान

भांडवल बाजारात ए. आय. वापरातून वाढते वित्तीय अस्थैर्य कशाप्रकारे हाताळावे ही मोठी समस्या निर्माण झाली असून, यासाठी वित्तीय स्थैर्य मंडळ जागतिकस्तरावर कार्यरत आहे. ६ मे २०१० मध्ये 'फ्लॅ क्लॅश' घटनेने ए.आय. बाल्यावस्थेत असताना कसा घोटाळा करू शकते, हे र स्पष्ट झाले. दुपारी अडीच वाजता केवळ १० मिनिटांत अमेरिकन शेअर बाजार १,००० अंकाने घसरून १ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले. नंतरच्या ३० मिनिटांत ६०० अंकांनी वाढ झाली. याचा अहवाल २०१५ मध्ये प्राप्त झाला व त्यात नविंदरसिंग सराओ दोषी सापडला.

असाच प्रकार २०१२ मध्ये व नंतर २०१५ मध्ये घडून आला. आता जनरेटिव्ह ए.आय. प्रगत होत असून, प्रणालीगत जोखीम (Systematic Risk) वाढली आहे. यामध्ये विदा पुरवणाऱ्या संस्थांवरील परावलंबन, विविध देशांतील वित्त बाजारांचे परस्परावलंबन, सायबर जोखीम यांचपरिणाम म्हणून ए.आय. भांडवल बाजारात जोखीम निर्माण करीत आहे. काही मोठ्या तंत्र प्रगत कंपन्या एकत्रित येऊन मक्तेदारी निर्माण करू शकतात व ही मक्तेदारी प्रस्थापित कायद्यांना व्यवस्थित बगल देऊन स्थापित करू शकतात.

नियमन धोरण आवश्यक 

कृत्रिम बुद्धिमत्ता व जनरेटिव्ह ए.आय. यांचा वापर सर्व गुंतवणूक संस्था व गुंतवणूकदार करीत असून, नाणेनिधी (IMF) च्या निरीक्षणानुसार भविष्यकालीन भांडवल बाजार अधिक कार्यक्षम व अधिक अस्थिर होणार आहे. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर अधिक प्रभावी नियमनाची आवश्यकता निर्माण होते. यंत्रभाषा, सखोल अध्ययन यापुढे आता स्वनिर्णय घेणारी व वेगाने त्याची अंमलबजावणी करणारी कार्यप्रणाली विकसित होत असून, अशा स्थितीत सर्किट ब्रेकर, मार्जिन ठरवणे अधिक आव्हानात्मक होत आहे. ए. आय. चा वापर करून जोखीम व्यवस्थापन अधिक प्रभावी होणे, बाजारात तरलता वाढवणे हे शक्य असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भांडवल बाजारात दिसू शकतात.

अनिष्ट धोकादायक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा ए.आय.चा वापर प्रभावीपणे नियमन संस्थांना करावा लागेल. ए. आय. बाजारपेठ २०२८ पर्यंत ४० टक्क्यांनी वाढणार असून, त्याची मूल्यवर्धी १.२९ ट्रिलियन डॉलर होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये भारतीय तंत्र संस्था, सॉफ्टवेअर कंपन्या मोठा वाटा उचलू शकतात. भांडवल बाजाराचा चेहरा, रचना व खोली ए.आय.च्यामाध्यमातून येत्या ५ वर्षांत मोठ्यपरिवर्तनाची नांदी दर्शवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news