नविन इंटरफेस, नविन अनुभव, जाणून घ्या Android 16 Beta मध्ये काय आहे खास ?

Android 16 Beta अपडेटमध्ये आला नवा Material Expressive डिझाईन, जाणून घ्या कसे कराल इंस्टॉल, कोणते मोबाईल होतील सपोर्टेड
Android 16 Beta
Android 16 BetaCanva
Published on
Updated on

Android 16 Beta:

Google ने आपला नवीन Android 16 Beta अपडेट रिलीज केला आहे, ज्यामध्ये एक नव्या प्रकारचा Material Expressive UI डिझाईन समाविष्ट आहे. हा इंटरफेस आधीच्या Material You डिझाईनचा अपग्रेडेड व्हर्जन आहे, जो या महिन्यात पार पडलेल्या Android Show दरम्यान सादर करण्यात आला होता. हा अपडेट त्याच यूझर्ससाठी आहे जे Android 16 Beta प्रोग्राममध्ये पहिल्या दिवसापासून सामील आहेत. सध्या हा अपडेट सिलेक्टेड डिव्हाइसेससाठी रोलआउट केला जात आहे.

Android 16 Beta
Early Signs Of Kidney Damage | शरीर देतं किडनी खराब होण्याचे हे संकेत! दुर्लक्ष न करता ओळखा लक्षणं

Android 16 Beta अपडेट कसे कराल इंस्टॉल?

जर आपण सपोर्टेड डिव्हाइस वापरत असाल, तर हे सोपे स्टेप्स फॉलो करून Android 16 Beta अपडेट इंस्टॉल करू शकता:

  • फोनची Settings उघडा

  • खाली स्क्रोल करून System सेक्शनमध्ये जा

  • Software updates वर टॅप करा

  • Android 16 QPR1 Beta अपडेट दिसेल

  • ते डाउनलोड करा आणि फोन रीस्टार्ट करा

  • रीस्टार्ट केल्यानंतर तुमचे डिव्हाइस नवीन Material Expressive UI ने सुसज्ज होईल

कोणत्या फोन्सना मिळेल हा अपडेट?

सध्या Android 16 Beta केवळ Pixel डिव्हाइसेससाठी उपलब्ध आहे:

  • Pixel 6, 6 Pro, 6a

  • Pixel 7, 7 Pro, 7a

  • Pixel 8, 8 Pro, 8a

  • Pixel Fold

  • Pixel 9, 9 Pro, 9 Pro XL

  • Pixel 9 Pro Fold

  • Pixel 9a

Android 16 Beta
Covid-19 New Variants 2025 | सावधान! कोविड-१९ नवे रूप धारण करतंय? नव्या स्ट्रेन्सचा किती धोका? जाणून घ्या तज्ञांचे मत

Material Expressive UI मध्ये काय आहे नवीन?

Google चा दावा आहे की या नवीन UI मध्ये यूझर्सना अधिक स्मूथ अ‍ॅनिमेशन्स आणि फ्लूइड इंटरफेस मिळेल. लॉक स्क्रीनवर आता Live Activities सारखे रिअल-टाईम अपडेट्स मिळतील जसे की तुमची कॅब किंवा फूड डिलिव्हरीचा स्टेटस.

याशिवाय, यूआयमध्ये मिळतील:

  • नविन कर्वी आयकॉन्स आणि फ्रेश फॉन्ट स्टाईल

  • सेटिंग्ज मेन्यूमध्ये वेगळ्या सेक्शनसाठी नवीन कलर टोन

  • होम स्क्रीन आणि लॉक स्क्रीन कस्टमाइज करण्यासाठी नविन स्टाईल सेक्शन

  • नोटिफिकेशन डिस्प्लेमध्ये बदल

कधी येईल Final Version?

Google जूनपर्यंत या QPR1 Beta ला स्टेबल करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून Android 16 चा पब्लिक वर्जन वेळेवर रिलीज करता येईल. सध्याच्या अपडेट्सचा वेग पाहता असं वाटतं की Pixel सीरीजच्या नवीन डिव्हाइसेसना हा Android वर्जन डिफॉल्ट स्वरूपात मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news