

Stomach Gut Health Tips in marathi
कधी तुम्ही गप्पा मारत बसलेले असताना अचानक तुमच्या पोटातून मोठा गुरगुर... असा आवाज आला आहे का? ही परिस्थिती थोडीशी लाजीरवाणी वाटू शकते, पण ती पूर्णपणे नैसर्गिक आहे. आपल्या शरीरावर याचा ताबा नसतो. पण प्रश्न असा आहे की, अशा आवाजाचं खरं कारण नेमकं काय?
पोटातून होणाऱ्या गुरगुर आवाजाला वैद्यकीय भाषेत "बॉरबॉरीगमस (Borborygmus)" असं म्हणतात. हा आवाज सहसा पोट रिकामं असताना अधिक जाणवतो. यामागचं कारण म्हणजे आपल्या पोटातील मांसपेश्यांची हालचाल. ज्याला पेरिस्टालिसिस (Peristalsis) म्हणतात. जेव्हा पोट रिकामं असतं, तेव्हा त्यातील गॅस आणि पाचक रस पुढे ढकलण्यासाठी मांसपेश्या आकुंचन पावतात. याच हालचालींमुळे पोटातून गुरगुर असा आवाज येतो.
भूक लागल्यावर "घ्रेलिन (Ghrelin)" नावाचा हार्मोन शरीरात वाढतो. हा हार्मोन मेंदूला सिग्नल देतो की, आता खाण्याची वेळ झाली आहे. घ्रेलिन वाढल्यावर पोटातील हालचाली आणखी वेगाने होतात, आणि त्यातून येणारा आवाजही अधिक तीव्र वाटतो.
यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे खाणं हा आहे. खाल्ल्यावर पोट भरल्यामुळे ही हालचाल शांत होते आणि आवाजही कमी होतो. तरीही पोटातील हालचाली सुरूच असतात, पण त्या इतक्या स्पष्ट ऐकू येत नाहीत.
पोटातून आवाज येणं सामान्य आहे, पण जर त्यासोबत हे लक्षणं दिसली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या:
वारंवार गॅस होणं
फुगलेलं पोट
डायरिया किंवा जुलाब
अन्न सहन न होणं (Food Intolerance)
कब्ज
पोटातून येणारा गुरगुर आवाज हा काही लाजण्यासारखा नाही.
तो केवळ तुमच्या शरीराचा एक सिग्नल आहे, "भूक लागली आहे!"
म्हणून पुढच्या वेळी असा आवाज आला तर लाजू नका, फक्त काहीतरी हेल्दी खा!