

मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक धर्मात अंत्यसंस्काराची पद्धत वेगवेगळी असते. हिंदू धर्मात शवाला अग्नी देतात, तर इस्लाम धर्मात मृतदेह दफन केला जातो. पण मुस्लिम समाजात मृतदेह का दहन का केला जात नाही? यामागे महत्त्वाची धार्मिक श्रद्धा आणि कारणे आहेत.
इस्लामची जीवनपद्धती, या पुस्तकातील संदर्भानुसार एखादी व्यक्ती मृत्यूच्या जवळ आली की कुराण वाचन करणाऱ्या विद्नानाला बोलावले जाते. त्याला कुराणातील छत्तिसावे प्रकरण वाचायला सांगितले जाते. यास ‘कलिमा’ असे म्हणतात. कलिमा म्हणजे ईश्वर हा एकमेव आहे.
मृत्यूनंतर शवाला स्नान घातले जाते. शवाचे डोळे आणि तोंड बंद करून देहाला पांढऱ्या स्वच्छ कपड्याने झाकले जाते. इतर देशांमध्ये हिरव्या कपड्याने झाकले जाते.
नमाज झाल्यावर मृतदेह कब्रस्तानात नेला जातो. इस्लामी परंपरेनुसार कबरीत मृतदेह किब्ल्याकडे म्हणजे मक्केकडे तोंड करून ठेवला जातो. कबर मातीने भरली जाते आणि त्यावर ओळखण्यासाठी दगड अथवा त्या व्यक्तीच्या नावाचे फलक ठेवले जाते.
शरीर अल्लाहची देणगी आहे – दहन करणे म्हणजे त्याचा अपमान मानला जातो.
आग म्हणजे यातना – इस्लाममध्ये अग्नीचा संबंध जहन्नमशी (नरक) जोडला आहे. मृतदेह दहन करणे म्हणजे आत्म्याला वेदना देणे असे मानले जाते.
पुनरुत्थानाची श्रद्धा – इस्लामनुसार कयामतच्या दिवशी अल्लाह प्रत्येकाला पुन्हा जिवंत करेल. म्हणून मृतदेह मातीत परत देणे ही श्रद्धेची खूण आहे.