

Lunar Eclipse 2026: नवीन वर्षाच्या मार्च महिन्यात भारतात एक खास खगोलीय घटना घडणार आहे. ३ मार्च २०२६ रोजी चंद्र ग्रहण लागणार आहे. या दरम्यान चंद्र लाल रंगात दिसणार आहे. त्याला लोक ब्लड मून देखील म्हणतात. हे ग्रहण दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल अन् सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी संपणार आहे.
भारतात या दिवशी सायंकाळी चंद्र ग्रहण पूर्णपणे दिसणार आहे. हे चंद्रग्रहण फक्त दिसायला सुंदर नाही तर त्याचे धार्मिक आणि पंचांगाच्या दृष्टीकोणातून देखील महत्व आहे.
या वर्षात मार्च महिन्यात फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा दोन दिवस असणार आहे. ही पौर्णिमा २ मार्च रोजी समोवारी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होणार आहे अन् ती दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ तारखेला सायंकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे होळीचे दहन निश्चित करणे अवघड होणार आहे. परंपरेनुसार पौर्णिमेच्या दिवशीच होळी पेटवली जाते. मात्र या वर्षी ग्रहण असल्यानं त्या काळात कोणतेही शुभकार्य केलं जात नाही.
ग्रहणाच्या आधी ९ तास म्हणजे ३ मार्चला सकाळी ६.२० वाजल्या पासून सूतक सुरू होणार आहे. त्यानंतर ग्रहण सुटेपर्यंत कोणतंही धार्मिक कार्य करता येणार नाही.
खगोलशास्त्रज्ञांच्या मते या वर्षी मार्च महिन्यात चंद्रग्रहण आणि ब्लड मून खूप सुंदर दिसणार आहे. रात्री आकाशात लाल चंद्र दिसणार आहे.
पहिले ग्रहण
नववर्षातील पहिले ग्रहण हे १७ फेब्रुवारीला असणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण असून रिंग ऑफ फायर प्रकारचं हे सूर्यग्रहण असणार आहे. ग्रहणाची ही स्थिती २ मिनिट ९० सेकंद असणार आहे. हे ग्रहण केवळ दक्षिण अफ्रिका, दक्षिण अर्जेंटिना आणि अंटार्टिकामधून दिसणार आहे.
दुसरे चंद्रग्रहण
वर्षातील दुसरे ग्रहण आणि पहिले चंद्रग्रहण ३ मार्च २०२६ रोजी होणार असून, ते भारतात पूर्णपणे दिसणार आहे. हे ग्रहण सुमारे ५८ मिनिटे चालेल आणि या काळात चंद्र पूर्णपणे लाल (Blood Moon) रंगाचा दिसेल. भारतात दृश्यमान असल्यामुळे या ग्रहणाचा धार्मिकदृष्ट्या विचार केला जाईल आणि त्याचा 'सूतक काळ' देखील पाळला जाईल.
तिसरे चंद्रग्रहण
वर्षातील तिसरे ग्रहण २९ जुलै २०२६ रोजी होणारे सूर्यग्रहण असेल, परंतु ते भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे येथे त्याचे वेध किंवा सूतक काळ पाळण्याची गरज उरणार नाही.
चौथे चंद्रग्रहण
वर्षातील चौथे आणि शेवटचे ग्रहण २८ ऑगस्ट २०२६ रोजी होणारे दुसरे चंद्रग्रहण असेल. हे शेवटचे ग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांतून दिसणार आहे. २८ ऑगस्टचे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याने, भारतीयांसाठी त्याचे कोणतेही धार्मिक नियम लागू होणार नाहीत.