Diwali 2026 : घरात लहान मुले आहेत? दिवाळीत या ५ चुका टाळा; अन्यथा घडू शकते मोठी दुर्घटना!

तुमच्या घरातही लहान मुले असतील, तर दिवाळीच्या दिवशी काही छोट्या-छोट्या चुका करणे टाळले पाहिजे.
Diwali 2026
Diwali 2026 : घरात लहान मुले आहेत? दिवाळीत या ५ चुका टाळा; अन्यथा घडू शकते मोठी दुर्घटना!file photo
Published on: 
Updated on: 

lifestyle parents guide diwali 2026 special 5 things not to do if you have toddlers at home

पुढारी ऑनलाईन : तुमच्या घरातही लहान मुले असतील, तर दिवाळीच्या दिवशी काही छोट्या-छोट्या चुका करणे टाळले पाहिजे. दिवे, फटाके आणि सजावटीच्या गडबडीत नकळत झालेली एखादी छोटीशी चूक मुलांसाठी मोठ्या अडचणीचे कारण ठरू शकते.

दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि भरपूर मिठाईचा सण आहे. या दिवशी घराची खास सजावटही केली जाते. ही सजावट पाहून लहान मुले खूप उत्साहित होतात. मात्र, लहान मुलांना अनेक गोष्टींची पुरेशी समज नसते. त्यामुळे दिवाळीच्या तयारीदरम्यान त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. अनेकदा घराच्या सजावटीपासून ते इतर तयारीपर्यंतच्या कामांमध्ये आपण इतके व्यस्त होतो की मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. अशावेळी क्षणभर जरी लक्ष विचलित झाले, तरी दुर्घटना घडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आधीपासूनच काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या घरातही लहान मुले असतील, तर यंदाच्या दिवाळीत या ५ गोष्टी करणे टाळा.

Diwali 2026
Narayana Murthy : आपल्या कामावर प्रेम करा, कंपनीवर नाही! नारायण मूर्ती असे का म्हणाले?

घरात लहान मुले असतील तर दिवाळीत करू नका ही ५ कामे

जळते दिवे आणि मेणबत्तीजवळ मुलांना कधीही एकट्याने सोडू नका दिवाळीत घराच्या सजावटीसाठी मेणबत्त्या आणि पणत्या लावणे सामान्य आहे. मात्र, तुमच्या घरात १ ते ३ वर्षे वयोगटातील लहान मुले असतील, तर या पणत्या आणि मेणबत्त्या लावल्यानंतर त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. लहान मुले प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पणत्या आणि मेणबत्त्या लावल्यानंतर मुले त्यांच्या आसपास जाणार नाहीत, याची नेहमी काळजी घ्या.

अतिशय मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नका

घरात लहान मुले असतील, तर फटाके फोडणे शक्यतो टाळावे. मात्र, तुम्हाला फटाके फोडण्याची आवड असेल, तर मोठ्या आवाजाचे फटाके घेणे टाळा. त्यांच्या आवाजामुळे लहान मुले खूप घाबरतात. त्यांच्या झोपेवरही परिणाम होतो. तसेच ऐकण्याच्या क्षमतेवरही दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी कमी आवाजाचे फटाके निवडू शकता.

सणाच्या आनंदात मुलांना एकटे सोडू नका

दिवाळीत घरी पाहुण्यांची ये-जा सुरू असते. तसेच घरातील सर्वजण सणाच्या तयारीत व्यस्त असतात. अशावेळी अनेकदा पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. मात्र, जळत्या पणत्या, मेणबत्त्या, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आसपास मुलांना कोणाच्याही देखरेखीशिवाय सोडणे योग्य नाही. तुम्ही कामात व्यस्त असाल, तर मुलांना एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या देखरेखीखाली ठेवा.

Diwali 2026
Shani Gochar 2026 : पुढील ४ महिने शनिदेव राहणार सक्रिय; 'या' ६ राशींना होणार मोठा फायदा!

अतिशय गर्दीच्या आणि गोंगाटाच्या ठिकाणी मुलांना घेऊन जाणे टाळा

दिवाळीत गेट-टुगेदर आणि पार्ट्यांचे आयोजन करणे सामान्य आहे. मात्र, तुमच्या घरात खूप लहान मुले असतील, तर त्यांना अतिशय गर्दीच्या किंवा गोंगाटाच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळावे. लहान मुलांसाठी मोठ्या आवाजातील संगीत, चमकणारे दिवे, गोंगाट आणि अनेक अनोळखी व्यक्तींची उपस्थिती त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे मुले चिडचिड करू शकतात आणि त्यांना अस्वस्थ वाटू शकते.

अस्वस्थ करणारे आणि लवकर पेट घेणारे कपडे मुलांना घालू नका

मुलांना सिंथेटिक फॅब्रिकचे कपडे घालणे टाळावे. हे कपडे दिसायला सुंदर असले, तरी मुलांसाठी जड आणि अस्वस्थ करणारे ठरू शकतात. तसेच पणती किंवा फटाक्यांची ठिणगी पडल्यास या कपड्यांना आग लागण्याचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे अशा कपड्यांऐवजी लहान मुलांसाठी आरामदायक, हवेशीर आणि सुती कापडाचे कपडे निवडा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.