मोत्यांचा साज

मोत्यांचा साज
Published on
Updated on

मोती हा प्रत्येक स्त्रीचा आवडता दागिना. मोत्याला ज्योतिषशास्त्रातही महत्त्व आहे. बहुतांश लोकांना त्यांच्या कुंडलीनुसार मोती घालण्यास दिला जातो; पण सौंदर्यशास्त्रात मात्र मोत्याची नजाकत काही औरच आहे. मोत्याची कुडी… मोत्याची अंगठी… मोत्याच्या बांगड्या आणि नाजूक मानेभोवती मोत्यांची माळ..! हा सौंदर्यवृद्धीचा दागिने म्हणजे स्त्रियांचा मनपसंद ठेवाच.

फॅशनमध्ये नवा ट्रेंड काय येईल, ते सांगता येत नाही, अगदी कशाचीही फॅशन येऊ शकते. सोने, चांदी, हिरे या आकर्षित करणाऱ्या दागिन्यांमध्येच मोतीही मोडतो. मोती दिसायला तसा नाजूक; परंतु त्याचे फायदे मात्र अनेक आहेत. रोमन साम्राज्यात मोत्याला खूप मान होता. समुद्राच्या तळाशी असलेल्या शिपल्यात मोती सापडतो. मोत्याच्या दागिन्याची लोकप्रियता आजही कायम आहे. १९ व्या शतकात हेन्री फिलिपने २ इंच लांब असलेल्या मोत्याचा शोध लावला होता. ब्रिटीश संग्रहालयात तो जपून ठेवण्यात आला आहे. समुद्रात सापडणारे मोती निमुळते असतात. त्यामुळे त्यांना कारागिरांकडून गोलाकार रूप दिले जाते.

हल्ली अनेक कंपन्या मोत्यांचे उत्पादन करत आहेत. विविध आकारात व प्रकारात येणाऱ्या मोत्यांनी महिलांच्या दागिन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. इव्हिनिंग वेयर, सूट व साडी यावर मोत्याचा नेकलेस किंवा इतर दागिने म्हणजे परफेक्ट मॅचिंग आहे. मोती शुभ्र, गुलाबी व क्रीम रंगात येतात. इतर राशिंच्या रत्नाप्रमाणे मोतीही राशीचा रत्न आहे. ग्रह शांतीसाठी सोने किंवा चांदीमध्ये मोती परिधान करावा लागतो. महिलांपासून तर महाविद्यालयातील तरुणींमध्येही मोत्याच्या दागिन्यांचा ट्रेंड आहे. मोत्याच्या रंगीबेरंगी अंगठ्या, नेकलेस, कानातील डूल व ब्रेसलेट आपले लक्ष वेधून घेत असतात. पाश्चात्त्य देशांत किंवा तेथील राजघराण्यातही मोत्याच्या दागिन्यांना खास मान आहे.
– वर्षा शुक्ल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news