कराड : प्रतिनिधी
दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी नेहमी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि सभासदांना नविन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला जातो. आताही सभासदांसाठी एक वेगळा विषय घेऊन कार्यक्रम आयोजित केला आहे.
मूळ नाटकाचे नसलेले विषयही जेंव्हा रंगमंचावर रोचक पध्दतीने सादर होतात, तेंव्हा तो विषय प्रेक्षकांना आपल्या जगण्याचा आणि जवळचा वाटतो. म्हणूनच वास्तुशास्त्रासारख्या वेदोक्त, सांस्कृतिक इतिहास असलेल्या विषयाचे महत्व पटवून देण्यासाठी सुप्रसिध्द वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव यांनी विषयाचे वास्तुरविराज नावाने नाट्यरुपांतर केले आहे.
विषयाचे महत्त्व जाणून दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबच्या वतीने सभासदांसाठी वास्तुरविराजच्या विशेष प्रयोगाचे आयोजन केले आहे. सातारा, शनिवार दि. 27 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 7, शाहू कला मंदिर, राजवाडा, सातारा. कराड, रविवार दि. 28 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 7 वाजता स्व. वेणूताई चव्हाण सभागृह,कराड येथे प्रयोग सादर होणार आहेत.
प्रत्येक माणसाला पैसा हवा असतो तो वृद्धिंगत व्हायला तसेच टिकायला हवा असतो; सुखी वैवाहिक जीवन, करिअर, संतान प्राप्ती, मुलांची शैक्षणिक प्रगती, घरात सुसंवाद, घरातल्यांचे आरोग्य चांगलं राहणं, आयुष्याच्या प्रत्येक पावलावर येणार्या समस्या, त्यांचे निवारण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कसं करायचं अनेक गोष्टींची सुंदर माहिती रंजक रुपात देणारा एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे वास्तुरविराज आणि महत्वाचे म्हणजे कस्तुरी सभासदांसाठी हा प्रयोग सादर केला जाणार आहे. याद्वारे आपल्या वास्तुमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करुन वास्तु अधिकाधिक सुखी आणि समाधानकारक होण्यासाठी डॉ. अहिरराव काही गोष्टी सांगणार आहेत. केवळ राहत्या घरातील अडचणीच नाही तर व्यवसायात येणार्या अडचणीही वास्तुमुळे असू शकतात हे सर्व जाणून घेवून वास्तुशास्त्रानुसार आपण या अडचणीवर मात कशी करु शकतो याचे ज्ञान या प्रयोगाद्वारे मिळणार आहे. कार्यक्रमास कस्तुरी सभासद व त्यांच्या पतीसाठी मोफत प्रवेश आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्रूती कुलकर्णी, कराड मो. 8805023653, भक्ती झणझणे सातारा मो. 9922249914
नोंदणीकाळातील लकी ड्रॉ
कराड ः पालकर ज्वेलर्स- 5 देवदास दिवे.धनश्री लेडिज वेअर 5 रेडिमेड कुर्तीज.
सातारा ः नागोरी ज्वेलर्स, श्री गणेश गोल्ड, मेकर ओव्हर ब्युटीपार्लर, शुभंम ज्वेलर्स, साई कलेक्शन,फेमिना ब्युटी अॅण्ड स्पा सेंटर. कार्यक्रमास उपस्थित असणार्या सभासदांनाच या लकी ड्रॉ चा लाभ घेता येईल.