हल्ली संगणक परोपरी असतो त्यामुळे संगणक वापरावा हाताळावा- साफ करावा लागत नाही, अशी व्यक्ती विरळाच ! घरचा जमाखर्च नोंदवून ठेवण्यापासून ऑफिसचं काम करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी संगणक सर्रास वापरला जातो.
(Computer Care Tips)
म्हणूनच संगणक स्वच्छ ठेवण्याच्या कामी उपयोगी पडतील, अशा पुढे नोंदवलेल्या अगदी सरळ, साध्या, सोप्या टिप्स आपल्यातल्या जवळपास सर्वांना नक्की उपयुक्त ठरू शकतात. संगणकाच्या कीबोर्डच्या बटणांमधील धूळ काढण्यासाठी मऊ (एक्स्ट्रा सॉफ्ट) ब्रश वापरता येऊ शकतो.
संगणकाच्या पोर्टस्मध्ये साचलेली धूळ काढण्यासाठीही असा ब्रश उपयोगी पडतो. काळजीपूर्वक साफसफाई करायची सवय असेल तर या दोन्हीसाठी एअर ब्लोअरही वापरता येईल.
• स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी शक्यतो मायक्रोफायबर कापड वापरावं. त्यामुळे स्क्रीन स्वच्छ होईल पण त्यावर ओरखडे येणार नाहीत.
• स्क्रीन क्लीनर स्प्रे वापरताना तो थेट स्क्रीनवर स्प्रे न करता आधी कापडावर स्प्रे करावा आणि नंतर त्या कापडाने स्क्रीन पुसावा. पाण्याचा वापर न केलेला चांगला.
• संगणकाच्या आतली धूळ काढण्यासाठी लहानसा एअर ब्लोअरही वापरता येईल. अर्थात हे काम करताना संगणक पूर्ण बंद करणं आणि प्लगही पिनमधून काढून ठेवणं गरजेचं !
• छोटा व्हॅक्यूम क्लीनर वापरूनही धूळ काढता येते. पण, तो कमी पॉवरवर वापरा. म्हणजे संगणकाच्या कुठल्याही लहान-मोठ्या भागाला नुकसान होणार नाही.
• आपल्या संगणकातल्या अनावश्यक फाईल्स, कॅशे आणि टेम्प फाईल्स काढून टाका. यासाठी डिस्क क्लीनअप टूल्स वापरा.
• नियमित अँटीव्हायरस स्कॅन करा. यामुळे मालवेअर आणि व्हायरसपासून संगणकाला संरक्षण मिळेल.
• जे सॉफ्टवेअर तुम्ही वापरत नाही ते अनइन्स्टॉल करा. यामुळे संगणकाची कार्यक्षमता आणि वेग वाढण्यास मदत होईल.