हल्ली जवळपास प्रत्येक व्यक्ती मोबाईल वापरते. पण, आपल्या या नेहमीच्या वापरातल्या आणि अत्यावश्यक गरजेच्या ठरत असलेल्या मोबाईलची काळजी कशी घ्यायची हे मात्र बर्याच व्यक्तींना ठाऊक नसतं.
मोबाईल विकत घेणं एक वेळ सोपं; पण तो नीट ठेवणं, सांभाळणं आणि वापरणं अवघड असं काहींना वाटतं ते त्यापायीच! म्हणूनच अशा सगळ्या मोबाईल वापरकर्त्यांना मोबाईलची काळजी कशी घ्यावी, याविषयी येथे नोंदवलेले मुद्दे मार्गदर्शक ठरू शकतात.
श्रमोबाईलसाठी मजबूत कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर वापरा. तडे जाणं आणि मोबाईल पडल्यामुळे होणारं नुकसान टाळणं त्यातून शक्य होतं.
अत्यंत तीव्र तापमानापासून मोबाईल दूर ठेवा. खूप उष्णता किंवा थंडी मोबाईलच्या बॅटरी आणि अंतर्गत घटकांना हानी पोहोचवू शकते.
श्रमोबाईल पाणी आणि धुळीपासून सांभाळा. तो नेहमी कोरडा आणि स्वच्छ असेल असं पाहा.
श्रचार्जिंग योग्य प्रकारे करा. अति चार्जिंग करणं किंवा बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होईपर्यंत थांबणं टाळा.
श्रमऊ सुती कापड आणि योग्य द्रावण वापरून मोबाईलची नियमित स्वच्छता करा.
श्रसॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा. नवीन अपडेटस्सह मोबाईल सुरळीत चालणं आणि सुरक्षित राहण्याची शक्यता बळावते.
श्रचार्ज करताना मोबाईलच्या मूळ चार्जर आणि केबलचा वापर करा.
श्रचार्जिंग करताना फोन खूप गरम होत असेल, तर चार्जिंग थांबवा.
श्रशक्यतो चार्जिंग करताना वाय-फाय, ब्लूटूथ बंद करा. चार्जिंग दरम्यान या सेवांचा वापर टाळा.
श्रचार्जिंगच्या ठिकाणची धूळ आणि ओलावा टाळा. चार्जिंग पोर्ट स्वच्छ ठेवा.
श्रमोबाईलचं की-पॅड दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहावं यासाठी की-पॅड वापरताना त्यावर जोर देणं टाळा. हलक्या हाताने बटणांचा वापर करा.
श्रशक्यतो ऑन-स्क्रीन की-बोर्ड वापरा. त्यामुळे फिजिकल की-पॅडवर भार कमी येईल.
श्रकी-पॅडवर पाणी किंवा इतर द्रव्यं सांडू देऊ नका. ओलाव्यामुळे की-पॅडचं नुकसान होऊ शकतं, हे कायम लक्षात असू द्या.