समृद्ध सोयाबीन

Soybean : समृद्ध सोयाबीन
soybean purchase
सोयाबीनfile photo
Published on
Updated on

प्रथिनांनी समृद्ध असलेलं सोयाबीनचं सेवन मानवी शरीरातली चयापचय प्रणाली निरोगी ठेवतं. योग्य पेशींच्या वाढीस आणि खराब झालेल्या पेशींची झीज भरून काढण्यास हातभार लावतं. यात आढळणारे पोषक घटक हाडं मजबूत करण्याचं काम करतात. सोयाबीनचं सेवन हृदयासाठी फायदेशीर ठरतंच शिवाय ते मानसिक संतुलन सुधारून मनाला ताजंतवानं ठेवण्याचंही काम करतं. सोयाबीनमध्ये उच्च दर्जाची प्रथिनं, तेल, कर्बोदकं आणि खनिजं असतात. कडधान्यांच्या तुलनेत कर्बोदकांचं प्रमाण यात अर्ध्यापेक्षा कमी असतं. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सोयाबीनचे पदार्थ फायदेशीर ठरतात. सोयाबीनमध्ये खनिज पदार्थ व जीवनसत्त्वं पुरेशा प्रमाणात असतात. कॅल्शिअम व फॉस्फरस यांच्या कमतरतेमुळे होणार्‍या हाडांच्या व दातांच्या आजारापासून संरक्षण देण्यासाठी सोयाबीन उपयुक्त ठरतं.

सोयाबीनमध्ये सेल्युलोज व हेमिसेल्युलोज हे तंतुमय घटक असतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेला प्रतिबंध केला जातो. लोहाचं प्रमाण सोयाबीनमध्ये भरपूर असल्यामुळे रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. सोयाबीन उच्च प्रतीच्या प्रथिनांनी म्हणजे आवश्यक अ‍ॅमिनो अ‍ॅसिडस्ने समृद्ध आहे. त्यामुळे आहारात सोयाबीनचा समावेश लाभदायी ठरतो. शरीराच्या विविध गरजा भागवण्याव्यतिरिक्त सोयाबीनचे सेवन अनेक रोगांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहे.

सोयाबीन ई जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. संपृक्त स्निग्धाम्लांचं प्रमाण सोयाबीनमध्ये अत्यंत कमी असतं. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. सोयाबीनच्या नियमित व प्रमाणबद्ध सेवनामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शारीरिक वाढ, त्वचेच्या समस्या आणि केसांच्या समस्यांवरही सोयाबीन खाणं फायदेशीर मानलं जातं. प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी विशेषत: शाकाहारी व्यक्तींना सोयाबीनचा पर्याय सर्वोत्तम म्हणून सुचवला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news