Health Benefits of Cucumber | काकडीचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी काकडी उपयुक्त
काकडीचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
काकडीचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतेfile photo
Published on
Updated on

साधारणपणे असं दिसतं की, आपल्याकडे काकडी सहजपणे, सर्वत्र, सर्व ऋतूत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. स्वच्छ, तजेलदार, सुदृढ दिसणारी, रसाळ काकडी मानवी शरीरासाठी उपकारक मानली जाते. कच्च्या आणि शिजवलेल्या अशा कुठल्याही स्वरूपात ती खाता येते.(Health Benefits of Cucumber)

काकडीत असतात महत्त्वाचे व्हिटॅमिन | Health Benefits of Cucumber

काकडीमध्ये मुख्यतः पाणी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि फायबर असतं. हे घटक पचन, रक्तदाब नियंत्रण, शरीराचं हायड्रेशन आणि त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.

हाडांच्या आरोग्यासाठी काकडीतलं व्हिटॅमिन के, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरू शकतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या पुनरुत्पादनासाठी व्हिटॅमिन 'ए' महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. पोषणतत्त्व काकडीत मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलिका आढळते.

रक्तदाब नियंत्रित करण्यास पोटॅशियम मदत करतं आणि स्नायूंच्या कार्यासाठीही ते गरजेचं असतं. हाडांच्या मजबुतीसाठी मॅग्नेशियम उपयुक्त आहे. त्वचा, केस आणि नखांच्या आरोग्यासाठी सिलिका फायदेशीर आहे.

काकडीमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं; परंतु नियमितपणे काकडी खाल्ली तर ही प्रथिनंसुद्धा शरीराच्या दैनंदिन कार्यांसाठी अत्यंत आरोग्यकारी ठरतात. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, ते शरीराचं हायड्रेशन सुरळीत राखण्यास मदत करतं. काकडीतले तंतुमय घटक (फायबर) पचनसंस्थेचं कार्य सुरळीत तर ठेवतातच; शिवाय बद्धकोष्ठतेपासून शरीराचं संरक्षण करतात.

काकडीतील सिलिका त्वचा, केस आणि नखांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडीच्या नियमित सेवनामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होत असल्या कारणाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्याने थकवा कमी होतो आणि ताजेतवानं वाटतं, काकडी सहज मिळते आणि न शिजवता अगदी तशीसुद्धा खाता येते, उपयोगात आणता येते. अर्थातच, आपल्या दैनंदिन आहारात काकडीचा समावेश करणं हे फक्त सोपंच नाही, तर फायदेशीरही ठरतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news