जपून ठेवलेल्‍या वस्‍तू सापडत नाहीत? मग ‘हे’ पर्याय वापरून पहा..

जपून ठेवलेल्‍या वस्‍तू सापडत नाहीत? मग ‘हे’ पर्याय वापरून पहा..
Published on
Updated on

अनेकदा असं होतं की एखादी वस्तू आपण अगदी आठवणीने एका जागी ठेवतो की वेळेवर ती सापडावी; पण प्रत्यक्षात मात्र जेव्हा त्या गोष्टीची गरज असते तेव्हा ती सापडत नाही. वेळेवर सापडावी म्हणून ठेवली होती; पण आता नेमकी सापडत नाही, काय करू माझ्या विसरभोळेपणाला अशी मनाची अवस्था होते! असं तुमचंही होत असेल तर घाबरू नका. वस्तू अति जपून ठेवण्याच्या मानसिकतेला तुम्ही बळी पडल्या आहात याचंच हे उदाहरण आहे.

ही मानसिकता माणसांमध्ये कॉमन आहे आणि स्त्रिया तर या बाबतीत आघाडीवर असतात कारण घरातला बहुतेक पसारा आवरण्याचं काम त्यांच्यावरच येऊन पडतं. घरातल्या व्यक्ती कामानिमित्त बाहेर पडल्यावर त्यांना घराची सफाई करावी लागते. त्यातून ती स्त्रीदेखील नोकरी करणारी असेल तर तिची धांदल काही विचारू नका. अशावेळी घर आवरण्याचं नकोसं वाटणारं काम त्यांच्यावर येऊन पडतं. त्यातून स्त्रीयांना वस्तू आवरताना त्या पुन्हा वेळेवर सापडल्या पाहिजेत असं जरा जास्तच वाटत राहतं, त्यामुळे त्या जपून ठेवण्याकडे त्यांचा कल असतो.

खरं तर अशाप्रकारे वस्तू एका ठिकाणी ठेऊन त्या पुन्हा न सापडणं हे अगदी स्वाभाविक आहे, कारण ज्या वस्तू आपण जपून ठेवत असतो त्या काही काळाने लागणार असतात त्यामुळे त्याची गरज पडते तोपर्यंत आपण त्या कुठे ठेवल्या आहेत याचा विसर पडणं अगदी सहज असतं. यावर उपाय काय तर अशा वस्तू ठेवायला एखादं कपाट किंवा ड्रावर निवडा, त्यात या वस्तू घालून ठेवा. किंवा तुमच्या डायरीत त्याची नोंद करून ठेवा.

अनेकदा लॉकरमध्ये किंवा फायलीत कोणते कागद ठेवले आहेत हे लक्षात राहत नाही अशावेळी नोंद करून ठेवणं सोपं आहे. फ्रीजवर मॅग्नेटिक शीट लावून त्यावर नोंद करून ठेवा. किंवा तुमच्या मोबाईलवर मेसेजमध्ये ड्राफ्ट करून ठेवा; पण त्याची कुठेतरी नोंद अवश्य ठेवा. आणि ज्याच्या त्याच्या वस्तू त्याच्याकडेच सांभाळून ठेवायला दिल्यात तर तुमच्या डोक्याचा ताप आपोआपच कमी होईल. पहा तुम्हाला यातला कोणता पर्याय चांगला वाटतोय ते!
– रमा मिलिंद (स्वच्छता)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news