अळूच्या पानांचा रस औषधी मानला जातो. यामध्ये ऑटइंपलमेटरी गुणधर्म असतात, सूज कमी करण्यासाठी व त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्याच्या कामी या गुणधर्माचा उपयोग करून घेतला जातो. अळूच्या पानांमध्ये अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते, ते डोळ्यांसाठी फायदेशीर उरतं.
अळू खाणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. अळूच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी आणि सुदृढतेला हातभार लावणारे पोषक घटक असतात. अळूच्या पानांचा वापर करून केलेली वडी, अळूचं फतफतं हे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ अनेक जण चवीने खातात. तसं पाहता विविध सूप आणि करीमध्येही अळूची पानं वापरली जातात. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी सर्वसामान्यपणे फारशी लोकप्रिय असल्याचं मात्र दिसत नाही. आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी जीवनसत्त्वं तसंच कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटिऑक्सिडन्टस् यांचं प्रमाण भरपूर असतं. मुख्यतः अळूतलं फॉलेट खास करून गर्भवती महिलांसाठी उपयुक्त मानलं जातं. कारण, हे गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असतं.
अळूच्या पानांचा रस औषधी मानला जातो. यामध्ये अँटिइंफ्लमेटरी गुणधर्म असतात. सूज कमी करण्यासाठी व त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्याच्या कामी या गुणधर्माचा उपयोग करून घेतला जातो. अळूच्या पानांमध्ये अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. ते डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. अळूच्या पानांमधले तंतुमय घटक अर्थात फायबर पचनक्रिया सुधारण्यास हातभार लावतं. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठ यावर अळूची पानं गुणकारी ठरू शकतात. शिवाय वजनही नियंत्रणात राहण्यास त्यातून मदत होते. यातलं अ आणि क जीवनसत्त्व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हाडांच्या सुदृढतेसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपकारक ठरतं.
थोडक्यात सांगायचं तर अळू आवडत नसला तरी त्याच्या बहुगुणांचा आपल्या शरीराला उपयोग व्हावा आणि आपलं शरीर सुदृढ राहावं यासाठी अळू खायला हवा. रक्तवृद्धीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी, हार्ड मजबूत ठेवण्यासाठी, डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी, स्नायूंच्या सुरळीत कार्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या सुदृढतेसाठी अळूचं सेवन फायद्याचं ठरेल, हे निश्चित